भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

दिगंबर गभने यांचा ‘वरठी पॅटर्न’ संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे

Summary

मोहाडी (प्रतिनिधी): मागील सहा वर्षांपासून वरठी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक दिगंबर गभने यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल व पारदर्शक करून राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, त्यांच्या कार्यपद्धतीची विशेष दखल आमदार परिणय […]

1-3968×2976-1-0#

मोहाडी (प्रतिनिधी): मागील सहा वर्षांपासून वरठी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक दिगंबर गभने यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल व पारदर्शक करून राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, त्यांच्या कार्यपद्धतीची विशेष दखल आमदार परिणय फुके यांनी घेतली आहे.

गावातील विविध शासकीय सेवा – ७/१२ उतारे, जात-उत्पन्न प्रमाणपत्रे, जन्म-मृत्यू दाखले, घरपाणी कर, नोकरी व योजनांची माहिती – या सर्व गोष्टी आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. कोणत्याही कामासाठी आता शिफारशी, फेऱ्या वा खर्च न करता ग्रामपंचायतीत त्वरित सेवा मिळते.

आमदार परिणय फुके यांनी स्वतः वरठी ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामसेवक दिगंबर गभने यांचं कौतुक केलं. “ग्रामपंचायतीचे कामकाज इतकं पारदर्शक, संगणकीकृत आणि वेळेत होणं म्हणजे इतर गावांसाठी प्रेरणा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘वरठी पॅटर्न’ राबविण्याची गरज

वरठी ग्रामपंचायतीचा कार्यपद्धतीचा ‘पॅटर्न’ हा गावांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतोय. नागरिकांना एकाच छताखाली सर्व सेवा मिळाल्याने वेळ, पैसा आणि त्रास वाचतो. डिजिटल व्यवहारामुळे कामांची गती वाढली असून, भ्रष्टाचारालाही आळा बसला आहे.

या यशस्वी मॉडेलचे अनुकरण करून इतर ग्रामपंचायतींनीही ‘वरठी पॅटर्न’ राबवावा, अशी जनतेतून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *