इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लि.प्रकल्प वाढिसाठी जनसुनावणी संपन्न प्रकल्पाच्या प्रांगणात अतिरिक्त जिल्हादंडाधिकार्यांचे अध्यक्षतेखाली जनसुनावणी संपन्न
Summary
बाजार गावं/कोंढाळी नागपूर जिल्ह्यातील मौजा सावंगा येथील मे.इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड सावंगा,पो.शीवा, तहसील नागपूर (ग्रा) जिल्हा नागपूर येथील स्फोटक आणि संरक्षण उत्पादनाच्या निर्मिती साठी विद्यमान प्रकल्पाचे प्रास्तावित विस्तारीकरणा साठी पर्यावरण विषयक सार्वजनिक जनसुनावणी इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड कंपनी चे आवारात शनिवार १२जून […]

बाजार गावं/कोंढाळी
नागपूर जिल्ह्यातील मौजा सावंगा येथील
मे.इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड सावंगा,पो.शीवा, तहसील नागपूर (ग्रा) जिल्हा नागपूर
येथील स्फोटक आणि संरक्षण उत्पादनाच्या निर्मिती साठी विद्यमान प्रकल्पाचे प्रास्तावित विस्तारीकरणा साठी पर्यावरण विषयक सार्वजनिक जनसुनावणी
इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड कंपनी चे आवारात शनिवार १२जून रोजी सकाळी ११-००वाजता नागपूर जिल्हाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तसेच उप प्रादेशिक अधिकारी किशोर पुसदकर यांचे प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक जाहिर सुनावणी घेण्यात आली.
या सार्वजनिक लोक सुनावणी दरम्यान ग्राम पंचायत सावंगा वलगत च्या गावातील २९०हून अधिक महिला/पुरूष या जनसुनावणीत सहभागी झाले.
या प्रसंगी प्रकल्प संचालकांनी वाढिव प्रकल्पाची आवश्यकता व सध्याची गरज या बाबतीत जन सुनावणी ला उपस्थित पर्यावरण विषयक जानते,हरा उपस्थित महिला, पुरूष,व अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.या नंतर जनसुनावणी चे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी प्रविण मिहिरे यांनी उपस्थित नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आवाहन केले.
यादरम्यान सावंगा निवासी सरपंच व पदाधिकारी तसेच शीवा सावंगा,देवळी डिगडोह, व लगतच्या गावांचे सरपंच तसेच पोलीस पाटील गावकरी— उपस्थित होते. काहींनी आप आपल्या समस्या मांडल्या तसेच स्थानिकांना रोजगार व अत्यंत आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याबाबद समस्या मांडल्या.
सार्वजनिक जनसुनावणी ला उपस्थित महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण व पर्यावरण विभागांचे वरिष्ठ अधिकार्यांनी १२जून रोजी आयोजित जनसुनावणी दरम्यान उपस्थित समस्या समजून घेतल्या. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रकल्प अधिकार्यांनी समाधानकारक उत्तर देऊन साधक बाधक चर्चा झाली व यात दोन्ही बाजूचे विचार जाणून घेण्यात आले.तसेच उपस्थित समस्यांबाबत समस्या निवारणाबाबद माहिती देण्यात आली.
या जन सुनावणी चे घटणास्थळी शेकडो लोक व पर्यावरण विद सहभागी झाले होते.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तसेच उप प्रादेशिक अधिकारी किशोर पुसदकर यांनी सांगितले की आम्ही उपस्थितितांची मते नोंदवून घेतली आहे आहे.लोकांचे मत पर्यावरण,वन, आणि हवामान बदल मंत्रालया कडे पाठविला जाईल. असे सांगितले गले.
कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांचे मार्गदर्शन शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
येथील जनसुनावणी शांततेत पार पडली.
या सार्वजनिक सुनावणी दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब रोहम,
राजस्व विभागाचे अधिकारी तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकारी व मे.इकॉनॉमिक लिमिटेड कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक सोमेश्वर मुंधडा, एम के सिंग,तकनिकी विभाग के जि एम एस के शर्मा
उपस्थित होते.