इंजि. राजेश पोलेवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Summary
वरोरा: बहुजनतील कुशल नेतृत्व, शेतकरी , कामगार बेरोजगार व सर्व समान्य जनतेबद्दल व ओबीसी समाजासाठी प्रथम महाराष्ट्रात आरक्षण लागु करण्यासाठी प्रयत्न करणारे व बहुजन समाजाची जाणीव असणारे , देशात महाराष्ट्राची अस्मिता निर्माण करणारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचन्द्र पवार […]
वरोरा: बहुजनतील कुशल नेतृत्व, शेतकरी , कामगार बेरोजगार व सर्व समान्य जनतेबद्दल व ओबीसी समाजासाठी प्रथम महाराष्ट्रात आरक्षण लागु करण्यासाठी प्रयत्न करणारे व बहुजन समाजाची जाणीव असणारे , देशात महाराष्ट्राची अस्मिता निर्माण करणारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचन्द्र पवार साहेब यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा , आदिवासी कल्याण , उच्च व तंत्र शिक्षण , नगर विकास , आपत्ति व्यवस्थापन राज्यमंत्री मा .ना . प्राजक्तदादा तनपुरे महाराष्ट्रराज्य यांचे हस्ते व राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष , बेबीताई उईके महिला जिल्हाध्यक्ष , बंडूभाऊ डाखरे जिल्हाकार्याध्यक्ष ओबीसी सेल चंद्रपुर व विलासभाऊ नेरकर वरोरा विधानसभा क्षेत्र यांचे मार्गदर्शनात राजुभाऊ कक्कड़ शहर अध्यक्ष , नितिनभाऊ भटारकर जिलाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस यांचे नेतृत्वात व दीपक जैस्वाल यांचे उपस्थितीत बालाजी सभागृह चंद्रपुर येथे इंजी .राजेश पोलेवार , इंजी रोहित पोलेवार, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघप्रणित संभाजी ब्रिगेड व प्रलय मशाखेत्री माजी जिल्हा कार्यध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला . या प्रवेशामुळे चंद्रपुर जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला आगामी काळात पक्ष बळकट करण्यसाठी मदत होणार आहे.
राजेश पोलेवार यांचा निवडीने परीसरात राष्ट्रवादी पार्टीमध्ये आनंद साजरा करण्यात आला व परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535