आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून भद्रावती तालुक्याला आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटरची मदत
Summary
भद्रावती (तालुका प्रतिनिधी):- भाजयुमोचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी केलेल्या मागणीला अनुसरुन विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून भद्रावती तालुक्याला नुकतेच आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर यंत्र देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाचे सात […]

भद्रावती (तालुका प्रतिनिधी):- भाजयुमोचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी केलेल्या मागणीला अनुसरुन विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून भद्रावती तालुक्याला नुकतेच आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर यंत्र देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाचे सात वर्ष नुकतेच पुर्ण झाले.
या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतर्फे विविध सेवा प्रकल्प संपूर्ण जिल्हयात राबविले जात आहेत. या माध्यमातुन शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा संकल्प आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून त्याचाच एक भाग म्हणून ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वाटप केले जात आहे. आ.सुधीर मुनगंटीवार यांनी भद्रावती तालुक्याला आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर यंत्र दिल्याबद्दल तालुक्यातील जनतेच्या वतीने व भाजयुमो तर्फे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे. तसेच तालुक्यातील गरजू नागरिकांनी काॅन्सन्ट्रेटर यंत्राकरीता इम्रान खान यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन इम्रान खान यांनी केले आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर