महाराष्ट्र हेडलाइन

आलापल्ली येथील आदिवासी सांस्कृतिक समाज भावनाचे भूमिपूजन !! जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे महत्त्वाचे योगदान. आता आश्वासन नको.. काम हवे.

Summary

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम: -दि.18 मे. आदिवासी समाजाच्या सांस्कृतीक तथा परंपरागत रूढी परंपरा, चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व आदिवासीचे कार्यक्रम घेण्यासाठी समाजाच्या समाजभवन नसल्याने अडचण होत होती. आलापल्ली येथे आदिवासी उत्सव समितीच्या जागा उपलब्ध असल्याने सदर जागेवर सांस्कृतीक समाजभवन […]

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम: -दि.18 मे.
आदिवासी समाजाच्या सांस्कृतीक तथा परंपरागत रूढी परंपरा, चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व आदिवासीचे कार्यक्रम घेण्यासाठी समाजाच्या समाजभवन नसल्याने अडचण होत होती. आलापल्ली येथे आदिवासी उत्सव समितीच्या जागा उपलब्ध असल्याने सदर जागेवर सांस्कृतीक समाजभवन उभारून दिल्यास समाजाचे कार्यक्रम घेण्यास सोईचे होईल व आम्हाच्या समाजाच्या सांस्कृतीक विकासालाही चालना मिळेल.
या उद्देशाने आदिवासी उत्सव समितीने जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना ७ फेब्रुवारीला निवेदन देवून समाज भवनाची मागणी केली होती. निवेदन स्वीकारताना जि.प. अध्यक्षांनी शब्द दिले आहे कि,’ आपण नेहमीच सर्व समाजाला मदत करित आलो असून आलापल्ली येथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने समाज भवन आवश्यक असून मी शब्द देतो कि येत्या काही दिवसांतच समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.
जिल्हा परिषदेच्या निधीतून १५ लाख रुपए मंजूर केले असुन काल सदर समाज भवनाच्या भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, सदस्य तथा माजी सरपंच विजय कुसनाके , माजी सरपंच दिलीप गंजीवार, माजी सरपंचा सौ.सुगंदा मडावी, सदस्य सौ.पुष्पलता जगताप, रमेश मडावी, व्येकटी मडावी, चन्द्रकांत बेझलवार, बंडू आत्राम, महेश सडमेक, प्रशांत गोडशेलवार आविस शहर अध्यक्ष अहेरी,सुधीर मडावी,जुलेख शेख,जुनेद शेख,रहीम भाई,सौ.नॉनुरवार आगंनवाड़ी मैडम आलापल्ली व आविस चे पदादिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *