नागपुर हेडलाइन

आर बी व्यास महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी कडून वृक्ष रक्षाबंधन संपन्न विद्यार्थ्यांनी झाडास मानला भाऊ, तर विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ.

Summary

कोंढाळी -वार्ताहर           स्थानिक कोंढाळी  येथील स्व. राजेंद्रसिंह उर्फ बाबा व्यास कला वाणिज्य  महाविद्यालयात आज दिनांक  ३०जुलै २०२३ ला  नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन  या सनानिमित्ताने  महाविद्यालयातील ”  ग्रीन क्लब व सांस्कृतिक विभागा ” तर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  झाडाला राखी बांधून हा […]

कोंढाळी -वार्ताहर

          स्थानिक कोंढाळी  येथील स्व. राजेंद्रसिंह उर्फ बाबा व्यास कला वाणिज्य  महाविद्यालयात आज दिनांक  ३०जुलै २०२३ ला  नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन  या सनानिमित्ताने  महाविद्यालयातील ”  ग्रीन क्लब व सांस्कृतिक विभागा ” तर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  झाडाला राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण अभिनव पद्धतीने साजरा केला . यात सर्वप्रथम महाविद्यालयातील विद्यार्थिनी  कु. जानव्ही जुन्नरे  , कु.पूर्वी चव्हाण,  कु. प्रीती घाटोळे व कु. सिमरन पोकळे   यांनी   दीप प्रज्वलित आरतीने झाडाला ओवाळले व राखी  बांधून आपला  भाऊ मानले  यानंतर उर्वरित मुलींनी सुद्धा झाडाला  राख्या बांधल्या   आम्ही आयुष्यभर   वृक्ष संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचू आणि झाडाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करू अशी आपली भावना  या विद्यार्थिनींनी व्यक्त केली.
         हा कार्यक्रम  महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य राजू खरडे तसेच  ग्रीन क्लब  चे समन्वयक डॉ. एल.आर घागरे सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॕ. जी.वाय. कठाणे , डाॕ. लाडके ,   डॉ. अंबाडकर ,डाॕ. उपाध्याय,  प्रा. भोसे तसेच  शिक्षकेतर कर्मचारी  व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *