BREAKING NEWS:
चन्द्रपुर मनोरंजन महाराष्ट्र हेडलाइन

आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्या सुरांनी साकारली माणुसकीची मैफल वीनस म्युझिकल अँड सोशल वर्क ऑर्गनायझेशनचा समाजभान जपणारा संगीतमय उपक्रम

Summary

चंद्रपूर | प्रतिनिधी संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाशी नाते जोडणारे प्रभावी माध्यम ठरू शकते, याचा जिवंत प्रत्यय चंद्रपूरमध्ये अनुभवायला मिळाला. वीनस म्युझिकल अँड सोशल वर्क मल्टीपर्पस ऑर्गनायझेशन, चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या […]

चंद्रपूर | प्रतिनिधी
संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाशी नाते जोडणारे प्रभावी माध्यम ठरू शकते, याचा जिवंत प्रत्यय चंद्रपूरमध्ये अनुभवायला मिळाला. वीनस म्युझिकल अँड सोशल वर्क मल्टीपर्पस ऑर्गनायझेशन, चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्या हिट्स” या संगीतमय कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकत समाजसेवेचा ठाम संदेश दिला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर संगीतकार आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्या गाण्यांनी रंगलेली ही मैफल केवळ संगीतप्रेमींना भुरळ घालणारीच नव्हे, तर माणुसकीचा हात पुढे करणारी ठरली. या कार्यक्रमातून जमा झालेला संपूर्ण निधी वर्धा येथील ‘आसमंत स्नेहालय, वर्धा’ या चॅरिटेबल संस्थेला दान करण्यात आला. समाजाप्रती बांधिलकी जपण्याची परंपरा वीनस ऑर्गनायझेशनने यापूर्वीही अनेकदा निभावली असून हा कार्यक्रम त्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
या कार्यक्रमास आसमंत स्नेहालय, वर्धाचे संस्थापक शिवाजीदादा चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच अशोक नंदुरकर, सुभाष शिंदे, देशमुख सर, जनार्दन झा, अ‍ॅड. अंबटकर, गोपाल दोमाडे, दुष्यंत नगराळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात शब्बीर शेख यांनी केली, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक असलम खान आणि जगदीश नंदुरकर यांनी अत्यंत संयत, रसपूर्ण आणि संवादात्मक शैलीत केले.
विदर्भातील नामवंत ऑर्केस्ट्रा कलाकार रवि यादव, सतीश कवरासे, शेखर शर्मा, सदानंद सपडी, मनोज देशमुख, बक्सारिया, निखिल जिरकोंटवार, बंटी सरजेकर, राहुल रामटेके, डॉ. अकोटवार, चहल (नागपूर) यांनी आपल्या वादनातून कार्यक्रमाला भव्य स्वरूप दिले.
तर गायक प्रकाश गुंटेवार, महेश बोडखे, राजेश धोंगडे, नितीन नंदनवार, डॉ. अंजली अंबटकर, शोभना शेख, ज्योती तोहगांवकर, मोहम्मद रफीक, अमोल दोमाडे, सचिन जुमडे, नेहा महंती, संचिता बनकर यांनी आपल्या मधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमात नटराज कथक डान्स ग्रुपच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण विकास भाऊ मुलेवार यांनी केले.
या यशस्वी उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विकास पडगेलवार, उपाध्यक्ष सुशील तलवेकर, सचिव शब्बीर शेख, खजिनदार नितीन नंदनवार, सल्लागार किशोर तलवेकर यांच्यासह सदस्य महेश बोडखे, किशोर मेश्राम, नरेंद्र जोगी, प्रकाश गुंटेवार, ज्योती तोहगांवकर, शोभना शेख, प्रशांत येडानुरवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष विकास पडगेलवार यांनी सर्व कलाकार, पाहुणे व रसिकांचे आभार मानले.
संगीताच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम चंद्रपूरकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला.

संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *