आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे तुणतूणे वाजवणाऱ्या अर्धवट बुद्धिच्या पोपटांसाठी…
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि ६ एप्रिल २०२१
—————————————
शूद्रांना (OBC, SC, ST, Conv. Minorities) राजा होण्याचा अधिकार नाही हे सांगणारी विषमतावादी मनुस्मृती आर्थिक आधारावर तयार केली की जातीच्या आधारावर तयार केली…? सर्व मंदिरांमधे ब्राह्मणांनी पुजारी होण्याचा मान आर्थिक आधारावर मिळवला की जातीच्या आधारावर…? ब्राह्मण अजूनही मंदिरात दिलेल्या दक्षिणेवर मजा मारतात, हे २१ व्या शतकातली सगळ्यात मोठं आरक्षण आहे, मग हे आर्थिक आधारावर आहे की जातीच्या आधारावर…?अर्जुन श्रेष्ठ धनुर्धर व्हावा म्हणून एकलव्याचा (भिल्ल जातीचा) उजव्या हाताचा अंगठा कपटाने कापुन टाकणारा ब्राह्मण गुरु द्रोणाचार्य (दुराचार्य).मग एकलव्याचा अंगठा कापून त्याची विद्या त्याकडून हिरावून अर्थात त्याचे मेरिट/गुणवत्ता त्यापासुन हिरावून घेणाऱ्या दुराचारी द्रोणाचार्याने कोणत्या आधारावर एकलव्याचा अंगठा मागितला .आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर.?रामायणात ज्ञानवर्धक शिक्षण देणाऱ्या शुद्र महर्षि शंभूक यांचा रामाने कपटाने खून केला, तो आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…? ब्राह्मणी पेशवाईत अस्पृश्यांच्या गळ्यात मडके व पाठीला झाडू कोणत्या आधारावर बांधला होता, आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…? अस्पृश्य समाजाला गावाबाहेर काढून त्यांना बहिष्कृत करून त्यांच्यावर अमानवीय अन्याय अत्याचार केले, ते आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…? छ. शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध आर्थिक आधारावर केला होता की , जातीच्या आधारावर…? जगतगुरु संत तुकोबारायांना अभंग रचताना वेद-शास्त्रांचा उपयोग करु नये म्हणून त्याकाळच्या ब्राह्मण धर्मपीठाने देहदंडाची शिक्षा केली ,ती आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…? जगदगुरु तुकोबारायांना “शूद्र ” व ” धर्मद्रोही ” घोषीत करुन त्यांची “गाथा” ब्राम्हणांनी पाण्यात बुडवली, ती आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…?महात्मा फुलेंना त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून ब्राह्मणांनी अपमान करून बाहेर काढले होते , ते आर्थिक आधारावर का जातीच्या आधारावर…? स्त्री शिक्षणाचा जागर करण्याऱ्या सावित्रीमाई फुलेंचा नाना प्रकारे अपमान प्रस्थापित ब्राह्मणांनी मनुवादी वृत्तीने केला, तो आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…? छ. शाहू महाराज्यांचे वेदोक्त प्रकरण आर्थिक आधारावर झाले होते की जातीच्या आधारावर…?डॉ. बाबासाहेबांचा आयुष्यभर द्वेष करण्यात आला, तो आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…? आजपर्यंत मागासवर्गीयांवर झालेले हल्ले, पुतळा विटंबना, गाड्यांचे नुकसान व जिवीतहानी, कोर्ट केसेस, बलात्कार, जातीय-शिवीगाळ, हाणामार, जातीय हिंसा, इत्यादि गोष्टी आर्थिक आधारावर होतात की जातीच्या आधारावर..?आजपर्यंत तथागत बुद्धापासुन ते साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे पर्यंतच्या तमाम मूलनिवासी बहुजन महापुरुष यांचा ह्या प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेने छळ केला तो आर्थिक आधारावर झाला होता की जातीच्या आधारावर…? आजही यूपी, बिहार च्या गावांमधे मागासवर्गीय नवऱ्याला घोड्यावरुन वरात काढू देत नाहीत, मग हे आर्थिक आधारावर ठरवितात की जातीच्या आधारावर…? आंतरजातीय विवाह करण्यास होणारा विरोध आर्थिक आधारावर असतो की जातीच्या आधारावर…? प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे (राज ठाकरे यांचे आजोबा) यांना पुण्यातील ब्राह्मणांनी पुण्यात रहाणे अशक्य केले होते, ते कशाच्या आधारावर केले होते की ज्यामुळे त्यांना पुणे सोडून मुंबईला रहायला जावे लागले, आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…?
पुण्यातील उच्चशिक्षित व उच्चपदस्थ कार्यरत असलेली सुशिक्षित ब्राह्मण महिला मराठा असलेल्या यादव ह्या महिलेला गणपती च्या सोवळ्याच्या जेवनावरुन व गणपती सारखे देव बाटवले म्हणून तिला शिवीगाळ करते, तिला मारते, तिचा अपमान करते, वर तिच्यावर पोलिसात केस देखील करते.
मग हे सर्व ती उच्चपदस्थ काम करणारी सुशिक्षित खोले बाई त्या निष्पाप यादव महिलेवर इतके अन्याय अत्याचार कोणत्या आधारावर करते ? आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…?सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शैक्षणिक दृष्टया उच्च आहेत, सामाजिक दृष्टया उच्च आहेत, देशाच्या महत्वाच्या व उच्च पदावर आहेत, आर्थिकदृष्टया देखील उच्च आहेत, तरीही त्यांना एखाद्या मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेवू दिले जात नाही, मग आरक्षण हे आर्थिक आधारावर मागणाऱ्यांनी कृपया सांगावे, की देशाचे राष्ट्रपती यांच्यामधे कोणती गोष्ट कमी होती कि ज्यामुळे त्यांना अक्षरशः त्या मन्दिरामधे धक्काबुक्की करून अपमान करून हाकलून देण्यात आले.
मग राष्ट्रपती पदावर असलेला करोड़पति असलेले प्रतिष्ठित व्यक्तिस कोणत्या आधारावर मंदिरा बाहेर हाकलून दिले जाते…!
आर्थिक आधारावर की जातीच्या आधारावर…?
कल अगर विजय माल्या, नीरव मोदी, सुशील मोदी, ललित मोदी, सुब्रतो रॉय, डी एस के कुलकर्णी, अदानी, अम्बानी, टाटा, बिरला, ओबेरॉय, आदि लोगोंने तहसीलदार से गरीबी का दाखिला लिया …
मैं गरीब हो गया…अब दो आरक्षण !
तो क्या करोगे…❓
आरक्षण मतलब गरीबी खत्म करने का कार्यक्रम नही है।
आरक्षण का मतलब प्रतिनिधित्व (Representation) है।
गरीबी खत्म करने के लिये सरकार के पास 24 लाख करोड से ज्यादा का बजेट है।
वो भी कम पड़े तो फाइव स्टार मंदिरोंमें जो अनगिनत धन पड़ा हैं, उसका इस्तमाल करे…!
जय भारत ! जय संविधान