आरोग्य कर्मचा-यांचा सैनिकाप्रमाणे लढा. @ कोरोना काळात आरोग्य सेवा सतत सुरु. @ भविष्यातही आरोग्य सेवा देण्यासाठी कटीबद्ध. @ जनसेवा करित असल्याचे खूप समाधान
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 28 मे. 2021:-
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. ऑन ड्युटी 24 तास सेवा देत या क्षेत्रातील कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईत एखाद्या सैनिकाप्रमाणे लढत आहेत. जीवाची पर्वा न बाळगता कोरोनाशी दोन हात करीत आरोग्य कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरु आहे.
शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी जीवाची पर्वा न बाळगता कोरोना सारख्या आजारातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत निरंतर सेवा देत आहेत. कुटुंबापासून दूर राहून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी, कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दिवस-रात्र झटत आहेत. कोरोना योद्धांच्या सेवेचे फलित म्हणजेच जिल्ह्यातील कोरोनमुक्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
मोनाली अनिल केवटे या आरोग्य विर्धनी केंद्र राजगाटा चेक येथे सामुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. केंद्रांतर्गत येणा-या गावातील कोरोना बाधित रुग्ण शोधण्याचे काम त्या नित्यनेमाने करीत आहेत. आरोग्य क्षेत्रातील कर्मचा-यांना कोविड योद्धा म्हणून देवू केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले आहेत. तसेच ग्रामीण भागात सेवा देण्यास आपण पूर्णपणे सहभागी असून आमच्या कार्याची दखल घेवून आम्हास पूर्णवेळ सामुदाय आरोग्य अधिकारी म्हणून सेवा प्रदान करावी. त्यामुळे आम्हाला पुढील आरोग्य सेवा देण्यास नवीन ऊर्जा मिळेल, असे मत सामुदाय आरोग्य अधिकारी मोनाली केवटे यांनी व्यक्त केले.
भविष्यातही असेच कार्य करणार
या आरोग्य वर्धिनी उपकेंद्र चुरचुरा येथे आरोग्य सेवक या पदावर कार्यरत आहेत. तया गावात आयएलआय, एसएआरआय सर्व्हेक्षण करणे, ताप, खोकला, श्वास घेण्यास अडचण असलेल्यांना आरएटी तपासणी करण्यास प्रवृत्त करणे, गृहविलगीकरणातील रुग्णांचा पाठपुरावा व सनियंत्रण करणे, गंभीर रुग्णांना डीसीएचसीला संदर्भित करणे, लसीकरणाविषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. त्या कोविड-19 च्या साथरोग काळात आरोग्य वर्धिनी केंद्र चुरचुरा येथे कार्यरत आहेत. या साथरोग काळात गावपातळीवर कार्य करताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र प्रत्येक अडचणीमधून मार्ग काढून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे. कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र सेवा देण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. कोरोना रुग्णांची शोधमोहीम, पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना कोविड केंद्रात उपचारार्थ दाखल करणे, लसीकरणाबाबत जनजागृती करणे आदी उपक्रम राबवित आहोत. समोरही असेच कार्य करीत राहणार असल्याचे मत आरोग्य सेविका स्मिता लोणारे यांनी व्यक्त केले.
वंदना अंकुश शेंडे या प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला अंतर्गत उपकेंद्र वसा येथे आरोग्य सेविका या पदावर कार्यरत आहेत. माताबाल संगोपन, कुटुंब कल्याण कार्यक्रम, सहा राष्ट्रीय कार्यक्रम, एनसीडी कार्यक्रम, कोविड-19 फेवर ओपीडी, कोविड लसीकरण करण्याचे काम त्या करतात. कोविड-19 या महामारी विरुद्ध लढा देण्यासाठी मी एक परिचारिका म्हणून मागील वर्षापासून कोविड फेवर ओपीडी तसेच कोविड-19 लसीकरणाच्या माध्यमातून रुग्ण सेवा करीत आहे. ओपीडीमध्ये आलेल्या रुग्णांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन, हात धुण्याच्या पद्धती याद्वारे कोविडपासून कसे प्रतिबंध करावे तसेच वेळेत उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. यादरम्यान मला खूप वेगवेगळे अनुभव शिकायला मिळाले. मात्र मनामध्ये कसलीही भीती न बाळगता मी निस्वार्थ सेवा देत आहे, याचा मला गर्व असल्याचे मत आरोग्य सेविका वंदना शेंडे यांनी व्यक्त केले.
दिनेश नामदेव भगत हे प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा अंतर्गत येणा-या उपकेंद्र साखेरा येथे आरोग्य सेवक पदावर कार्यरत आहेत. ते आरएटी टेस्ट करणे, गृहविलगीकरण, औषधोपचार करणे, कोविड लसीकरणाचे काम नित्यनेमाने करीत आहेत. कोविड काळात रुग्णांची रॅट तपासणी करणे, बाधितांना गृहविलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे, कोविड लस घेण्याविषयी जनजागृती करणे, लसीकरणाबाबत लोकांचे गैरसमज दूर करणे, कोविड प्रादुर्भावात मागील 1 वर्षापासून निरंतन आरोग्य सेवा सुरु असून रुग्णांची सेवा करण्याचा आपणास अभिमान असल्याचे मत आरोग्य सेवक दिनेश भगत यांनी व्यक्त केले.