आरे वसाहतीचा शाश्वत विकास करणार – पालकमंत्री आदित्य ठाकरे आरे वसाहतीमधील आदिवासी पाड्यांत लसीकरणास प्रारंभ
Summary
मुंबई, दि. 2 : आरे वसाहतीतील अनुसूचित जमातीच्या रहिवाशांसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले होते. यावेळी वसाहतीतील रहिवाशांसाठी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. ठाकरे यांच्या हस्ते खांबाचा पाडा […]
मुंबई, दि. 2 : आरे वसाहतीतील अनुसूचित जमातीच्या रहिवाशांसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले होते. यावेळी वसाहतीतील रहिवाशांसाठी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. ठाकरे यांच्या हस्ते खांबाचा पाडा येथे त्याचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरणाचा वेग वाढवला जातोय. लसींच्या उपलब्धतेनुसार पुढील काही दिवसांत सर्वांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून श्री. ठाकरे यांनी एकही आदिवासी बांधव यापासून वंचित राहणार नसल्याचे आश्वस्त केले. याचबरोबर आरे वसाहतीचा शाश्वत विकास केला जाणार असून मुख्य रस्त्याचे काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून येत्या ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.