नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

आमदार अनिल देशमुख यांनी पाणीटंचाईवर घेतली आढावा सभा

Summary

काटोल/प्रतिनिधी -दुर्गा प्रसाद पांडे गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे आदेश माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारला तहसील कार्यालयात पाणीटंचाई या विषयावर पाणीपुरवठा विभाग तसेच ग्रामसेवक सरपंच व संबंधित विभागाची माहिती जाणून घेण्यासाठी पाणी टंचाई आढावा सभा […]

काटोल/प्रतिनिधी -दुर्गा प्रसाद पांडे
गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे आदेश
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारला तहसील कार्यालयात पाणीटंचाई या विषयावर पाणीपुरवठा विभाग तसेच ग्रामसेवक सरपंच व संबंधित विभागाची माहिती जाणून घेण्यासाठी पाणी टंचाई आढावा सभा आयोजित केली होती .सभेला काटोल तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते. सरपंचांनी पाणीपुरवठा वीज भरणाबद्दल ग्रामपंचायत ची आर्थिक परिस्थिती सुदृढ नसल्याने त्यावर उपाययोजना शासन स्तरावर व्हावी याबद्दल जोरदार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी केली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक गटविकास अधिकारी झेलगोंदे यांनी केले तर पाणीपुरवठा विभागाची माहिती उपविभागीय पाणीपुरवठा अभियंता श्री बावणे तथा अभियंता श्री कुरळकर यांनी पूर्ण तालुक्याची माहिती कार्यक्रमादरम्यान दिली. यामध्ये जलजीवन मिशन व अटल भूजल योजना या शासनाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग काटोल यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल आमदार अनिल देशमुख यांनी प्रशंसा करून इतर विभागातील अधिकाऱ्यांनी यांचा आदर्श घ्यावा असे प्रतीत केले भूगर्भ शास्त्रज्ञ सुद्धा उपस्थित होते त्यांनी गावातील हँड पंपच्या पाण्याबद्दल मार्गदर्शन करून ते पाणी पिण्यायोग्य कधी चांगले अथवा वाईट असते याबद्दल विस्तृत माहिती दिली प्रत्येक ग्रामपंचायती ग्रामसेवकांतर्फे माहिती घेण्यात आली काही ग्रामपंचायत सरपंच यांनी आपापल्या समस्या देशमुख यांच्यासमोर मांडल्या. काही ग्रामसेवक गैरहजर असल्याने नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रसंगी अनिल देशमुख यांनी दिले. वीजपुरवठ्याच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आघाव हे उपस्थित होते त्यांनी सरपंच यांचे प्रसंगी समाधान केले. पाणीटंचाई आढावा कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी आढावा प्रसंगी आपापले विचार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाला सभापती संजय डांगोरे उपसभापती निशिकांत नागमोते पंचायत समिती सदस्य उपविभागीय महसूल अधिकारी श्रीकांत उंबरकर तहसीलदार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता अभियंता गेडाम, नायब तहसीदार विजय डांगोरे, बंडू जवंजाळ , पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल ठाकरे गणेश चन्ने अनुप खराडे अजित लाडसे भूषण मुसळे गौरव मानकर प्रशांत पवार माजी जिल्हा परिषद सदस्य श्री मरकाम तथा आजी-माजी लोकप्रतिनिधी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांच्या भाषना नंतर आढावा सभेच्या कार्यक्रमाची सांगता झाली. पंचायत समिती काटोल यांच्या आढावा सभेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल अधिकारी व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *