हेडलाइन

आपल्या लेकरांना सर्वोच्च प्रगत शिक्षण द्या..ॲड.डॉ.सत्यपाल कातकर.

Summary

राजुरा, तेलंगाना राज्यात कोंडीबागुडा केरामेरी येथे डॉ.बाबासाहेब जयंतीनिमित्त आयोजित दिनांक २६ एप्रिल २०२५ च्या कार्क्रमात ॲड.डॉ.सत्यपाल कातकर मुख्यमार्गदर्शक व कार्यक्रम अध्यक्ष म्हूणन मौलिक मार्गदर्शन केले. तेलंगना राज्यात डॉ. बाबासाहेब जयंती संपूर्ण एप्रिल महिनाभर साजरी केल्या जाते ह्य अनुषंगाने कोंडीबागुडा बौद्ध […]

राजुरा,
तेलंगाना राज्यात कोंडीबागुडा केरामेरी येथे डॉ.बाबासाहेब जयंतीनिमित्त आयोजित दिनांक २६ एप्रिल २०२५ च्या कार्क्रमात ॲड.डॉ.सत्यपाल कातकर मुख्यमार्गदर्शक व कार्यक्रम अध्यक्ष म्हूणन मौलिक मार्गदर्शन केले.
तेलंगना राज्यात डॉ. बाबासाहेब जयंती संपूर्ण एप्रिल महिनाभर साजरी केल्या जाते ह्य अनुषंगाने कोंडीबागुडा बौद्ध मंडळ द्वारे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध मनोवैज्ञानिक, संविधानतज्ञ ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांनी मुख्य मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.याप्रसंगी ॲड.डॉ.सत्यपाल कातकर म्हणाले “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार कृतीत अंमल गेल्या पन्नास वर्षापासून आपण केले असते तर आपल्या गावात पन्नासपेक्षा जास्त अधिकारी असते व आपल्याकडे हीन नजरेनी पाहण्याची कुणी हिंमत केली नसती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी दिलेला उपदेश ‘शिका’ हा कृतीत अंमल करा व आपल्या लेकरांना सर्वोच्च प्रगत शिक्षण द्या. प्रगत शिक्षणामुळेच आपला स्वाभिमान व दर्जा वाढेल व प्रगत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.तसेच भातीय संविधानासंदर्भात ते म्हणाले ‘आपल्या संविधानाने न्यायालयास संपूर्ण स्वतंत्रता दिलेली आहे आणि जोपर्यंत केशवानंद भारती मध्ये सुप्रिम कोर्टने दिलेला निर्णय फेरवीचार पुन्हा सर्वोच्च न्यायालय करणार नाही तोपर्यंत भारतीय संविधानाच्या मुलभूत सिद्धांताला संसद बदल करू शकत नाही’. तसेच बौद्ध धम्माच्या भविष्याबद्दल बोलताना म्हणाले कि “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या वैज्ञानिक बौद्ध धम्मात पूजा पाठ व अतिधार्मिक उन्माद व अंधश्रद्धा जनतेत रुजविण्याचे षडयंत्र बहुतांश राजकीय नेते व भिक्कूद्वारा होत आहे त्यापासून सावध होऊन वेळीचं प्रतिबंध केले पाहिजे ”असे मौलिक मार्गदर्शन केले.ह्याप्रसंगी मधू बावलकर,साहित्यिक, तेलंगाना,ऋषीजी वाघमारे,तालुका अध्यक्ष, समाज क्रांती आघाडी,राजुरा ह्यांनीही मार्गदर्शन केले तर विचारमंचावर विजय उपरे,माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, राजुरा, माधव वाघमारे सर आदिलाबाद,प्रथम कांबळे,अण्णाराव कांबळे गुरुजी उपस्थित होते तर कार्क्रमाचे सूत्रसंचालन गजानन कांबळे ह्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *