आपल्या जीवनाला आपनच घडवू शकतो ईच्छेला प्रयत्नाची जोड मिळाल्यास ईच्छा पुर्णत्वास जाते महाराष्ट्रातील प्रसिद्ध सीतार वादक -विदुर महाजन पुणे
कोंढाळी-
सीतार -(वीणेच्या) तारेतून मानसिक ताण तणाव कमी करण्याचे एक माध्यम आहे. मानसिक स्वास्थ्य सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी सीतारे (वीणा वादन)चा संपूर्ण राज्यात व देशात प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळा/ महाविद्यालये व अन्य सामाजिक व संगित संस्थांचे मध्यातून संपुर्ण राज्यात नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सुप्रसिद्ध सीतार वादक -विदुर महाजन यांनी नागपूर जिल्ह्यातील लाखोटीया भुतडा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व सी बी एस ई हायस्कूल येथे व्यक्त केले. यावेळी सुमारे २४०० विद्यार्थी विद्यार्थिनींना सीतार वादातून जीवनात मिळणाऱ्या मानसिक समाधान , त्यातून दैनंदिन कमी होणारा ताण तणाव त्यांनी सीतार वादनाचे प्रत्यक्षितातून समजावून सांगितले. संगीत व वीणा वादातून मिळणारा भाव त्या भावाचा भावार्थ,. त्यातून उत्पन्न होणारी संगीत ईच्छा शक्ती क्षमता व उत्सुकता या बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे सीतार व संगीत, त्या बाबतीत विविध पहलूंची उकल करवून दाखवली. सितार जग विख्यात कसे झाले, देशी संगीत आणि पाश्चिमात्य संगीताची विस्तृत माहिती दिली.
शिक्षणात संगीत व संगीताचे महत्त्व, राग व त्याचे अर्थ प्रात्यक्षिक करून समजावून सांगितले. तसेच आपणच आपले जीवन आनंदमय कसे ठेवू शकतो. याची जाणीव व जागृती केली. अभिनय संगीत
शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुधीर बुटे यांच्या, प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते दुर्गा प्रसादजी पांडे, उपमुख्याध्यापक कैलास थुल, सी बी एस ई हायस्कूलचे उपप्राचार्य योगेश चौधरी, पर्यवेक्षक मनोज ढाले हरिष राठी परिक्षा प्रमुख प्रिया धारपुरे, सुनिल सोलव, यांचे उपस्थिती होती.प्रसिद्ध सितार वादक -विदुर महाजन पुणे , अद्वित देशपांडे वर्धा व त्यांच्या सहकाऱ्यांनी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व सी बी एस ई हायस्कूल चे हजारों विद्यार्थ्यांसमक्ष सीतार वादानातून संगीता विषयी महत्वाची माहिती सादर केली. या प्रसंगी सीतारवादनाला हजारो विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्तम साद दिली. सीतार वादक -विदुर महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालक्त्व दुर्गाप्रसादजी पांडे यांनी अभियांनाची मार्गदर्शनात प्रसंशा केली. आयोजनास यशोदा नासरेसहकार्य लाभले कार्यक्रमांचे संचलन पर्यवेक्षक हरिष राठी तर आभार प्रा.वादाफळे यांनी मानले. आयोजनास सामाजिक उत्सव समिती प्रमुख यशोदा नासरे, ध्वनीक्षेपण शुभम राऊत, रवींद्र जायभाये, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले. विदयार्थ्यांनी अतिशय शिस्तीत कार्यक्रमाचा लाभ घेतला.