आपल्या क्षेत्रातील पाणी! आपल्या भागातच रोखा!!

आपल्या क्षेत्रातील पाणी! आपल्या भागातच रोखा!!
चिंतामणराव जोशी
गावो गावी पिझोमिटर यंत्र (स्वयंचलित भू जल पातळी मोजणी यंत्र) बसविण्यात येणार
राज्यात1440गावांची भू जल पातळी धोक्याच्या पातळी पेक्षा ही खालावली आहे.आता! आपल्याला आपल्या क्षेत्रातील व गावातील पाणी आपल्याच भागातच रोखून त्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या विंधन विहीरी, शेतातील विहीरींची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, या करिता अटल भू जल योजना व त्यांचे निकष व या योजनेचे अधिकारी आपल्य सोबत सहकार्यला सदैव सहयोग करतील असे मत भू जल सर्वेक्षण विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्याचे(पुणे) आयुक्त चिंतामणराव जोशी यांनी गुरूवार 10फेब्रुवारी रोजी नागपुर जिल्य्ह्यातील काटोल तालुक्यातील ग्रा प धुरखेडा येथे व चीखली (मासोद)येथे
जलशक्ति मंत्रायल- केंद्रीय भू जल बोर्ड तसेच सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा व सौहाद्र प्रशिक्षण संस्था गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने दोन्ही ग्रा प येथील महीला पुरूष शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गटांचे सदस्यां एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन प्रसंगी मार्गदर्शन करतांना सांगितले. वाहते पाणी अडवून भू जल पातळी ची वाढ करण्या संबधी उपाययोजनांचे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन प्रसंगी माहीती देण्यात आली. या कार्यशाळेला महाराष्ट्र राज्य भू जल विकास यंत्रणा पुणे तसेच नागपुर चे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन कार्यशाळेच्या आयोजनाची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रसंगी धुरखेडा येथील सरपंच विठ्ठलराव उके, उपसरपंच सुदर्शन झोडे तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य व शेतकरी महिला पुरूष ग्रा प सचीव मनिषा मोरे व गावकरी उपस्थित होते.
गावो गावी पिझोमिटर (स्वयंचलित भू जल पातळी मोजणी यंत्र) बसविण्यात येणार
नागपुर जिल्ह्यात चीखली (मासोद)येथे पहिलेच उद्घाटन
ग्रामीण भागातील खालावत जाणारी पाण्याच्या पातळी ने ग्रामीण शेतकरी आपल्या पीकाला आवश्यक वेळी पाणी मिळावे या करिता ग्रामिण भागातील भू जल पातळी चे निरिक्षण करण्या साठी केंद्रिय जल शक्ती मंत्रालय-तसेच भू जल सर्वेक्षण विभागा मार्फत पावसाळ्याचे पावसाचे पाणी तसेच ग्रा प क्षेत्रात संग्रहित जल साठ्याची माहिती होण्यासाठी भू जल पा संगणिकृत पिझोमिटर बसविण्यात येणार असल्याची माहिती राज्य भूजल सर्वेक्षण संचालक पुणे चिंतामणराव जोशी यांनी दिली तसेच नागपुर जिल्य्ह्यातील काटोल विधानसभा मधील काटोल पंचायतीचे चीखली (मासोद)येथे पिझोमिटर बसविण्याचे उद्घाटन ही आयुक्त चिंतामणराव जोशी तसेच चीखली येथील सरपंच रेखा गोंडाणे,उप सरपंच हरिदास चोपडे पं स सदस्य लता ताई धारपुरे, ग्रा प सदस्य राजेंद्र धोटे, दिनेश चौधरी, शितल चोपडे सुनीता बल्की, लिलाबाई बिसेन, रंजना ढोले जल सुरक्षक मोरेश्वर धारपुरे, प्रमोद धारपुरे, माला ताई चोपडे ग्रा प सचीव किरन वानखेडे तसेच या प्रसंगी भू जल विकास यंत्रणा डाक्टर विजय पाकमोडे, उप संचालक शिवाजी पद्मने, वरिष्ठ भू जल वैज्ञानिक व सर्वेक्षक विकास यंत्रणा नागपुर, वरिष्ठ भू वैज्ञानिक मंगेश चौधरी, वरिष्ठ भू वैज्ञानिक वर्षा माने, राजेश गावंडे, नंदकिशोर बोरकर, प्रकाश बहादे, मंगेश सोनवने, दर्शन दुरबळे यांचे उपस्थितीत स्ययंचलित भू जल पातळी मोजनी मापक यांत्राचे उद्घाटन करण्यात आले.