आपण अजूनही बहयाड आहोत !▪ ▪ स्वर्गातील लोकांना पिंडदान एक भ्रामक कल्पना ▪
▪प्रासंगिक▪
▪अक्षय तृतीयेच्या निमित▪
▪ आपण अजूनही
बहयाड आहोत !▪
▪ स्वर्गातील लोकांना
पिंडदान एक भ्रामक
कल्पना ▪
▪ सो कॉल्ड सु ..शिक्षितांच्या
डोळ्यात झणझणीत
अंजन ▪
पोलीस योद्धा वृत्तसंस्था
वर्धा :- दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी आपल्या पितरांना पिंडदान करण्याची लगबग पाहिली की गाडगेबाबांची ती आठवण हमखास येते.
एकदा गाडगेबाबा पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात साफसफाई करत असताना नदीच्या किनाऱ्यावर काही पुरोहित व भाविक काही धार्मिक विधी करताना त्यांना दिसले.
एका पत्रावळीवर अनेक पंचपक्वान्न सजवून ठेवण्यात आले होते. बाजूला कसली तरी पूजा मांडली होती सुगंधी उदबत्तीचा घमघमाट सुटला होता.
बाप्पा ते सगळं पाहून बाबांनी उत्सुकतेने पुरोहिताला प्रश्न केला . ‘ महाराजजी , कसली पूजा चालू आहे जी ‘ ?
बाबांच्या गबाळ्या वेशाकडे तुच्छतेने पाहात पुरोहित बाबांनी पुरोहित बाबांना म्हणाला, हे वेड्या तुला नाही हे कळणार. हा तर्पण आणि पिंडदान विधी आहे.’
बाबांनी पुन्हा प्रश्न केला, ‘ काय असते जी ते ?
पुरोहिताचा सहाय्यक म्हणाला ‘अरे स्वर्गातल्या आपल्या पूर्वजांना अन्नदान करण्याचा विधी असतो हा’.
शांत राहतील तर बाबा कसले. त्यांनी पुन्हा प्रश्न केला, ‘ ‘महाराज हा स्वर्ग कुठे असतो जी?’
त्यावर पुन्हा तुच्छतेचा कटाक्ष टाकत तो पुरोहित म्हणाला ‘ खुप खुप दूर असते’.
बाबा ‘म्हणाले म्हणजे आपलं पुणे-मुंबई एवढं ?’
यावेळी पुरोहिताचा सहाय्यकानेच उत्तर दिले अरे नाही रे . खूप दूर असते .चंद्र सूर्य यापेक्षाही दूर’
बाबांनी पुन्हा प्रश्न केला, ‘पण एवढ्या दूर हे अन्न कसे पोहोचते जी ?’
आता मात्र पुरोहिताचा संयम संपला ‘अरे मुर्खा चल निघ इथून. ते अन्न नाही आहे . पिंड आहे . तुझ्या सारख्या बेअक्कल माणसाला ते कळणार नाही. मंत्राच्या शक्तीने ते स्वर्गात पोहोचते.’
हे ऐकून बाबा बाजूलाच चंद्रभागेच्या पात्रात उतरले. आणि तोंडाने काहीतरी बडबडत दोन्ही हातांनी नदीतील पाणी बाहेर उडवायला लागले.
तिथे उपस्थित सर्वांनी प्रारंभी वेडा म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण बाबा पाणी उडवीत राहिले.
ते पाणी पुरोहितांनी मांडलेल्या पूजेवर उडाले. आता सगळे चिडले .
पुरोहित संतापून बाबा जवळ हातउगारत आला , ‘काय करतो आहे ‘ त्याने दरडावून विचारले.
बाबा नम्रपणे म्हणाले, काही नाही जी माया शेताले पाणी देऊन राहिलो . यावर्षी दुष्काळ आहे ना जी तिकडं वऱ्हाडात’
कुठे आहे तुझं शेत पुरोहिताने विचारले.
‘ त्यात इकडे आहे जी. उमरावती जिल्ह्यात वलगावकड’
किती दूर आहे ते?
‘ काही नाही असं चारशे-पाचशे(४००-५००) मैल’
‘ अरे मुर्खा, एवढ्या दूर पाणी कसं पोहोचण, पुरोहिताने विचारले.
बाबा म्हणाले, म्या विचार केला. तुमचं पिंड चंद्र-सूर्याच्या पल्याड स्वर्गात पोहोचते म्हणता. त माय शेत चारशे-पाचशे मैलच आहे जी. तिचं पाणी नक्कीच पोहोचण ना जी’
गाडगे बाबांचे हे उत्तर ऐकून तो पुरोहित आणि तिथं पिंडदान विधी करणाऱ्या साऱ्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडले.
रूढार्थाने निरक्षर असलेले गाडगेबाबा केवळ तर्क बुद्धीच्या जोरावर सोकाल्ड सु …..शिक्षीतानच्या डोळ्यात अंजन घालत होते.
असे पिंडदान, सत्यनारायण असे निरर्थक विधीत करणाऱ्यांचा उल्लेख ते कायम बयाड बेलने कसा करत.
दुर्दैव…..आमचे दुर्दैव……
बाबांना जाऊन आज त्रेसष्ट वर्ष झालेत पण आपण अजूनही ब ह्याड बेलने त बह्याडबेलनेच
आहोत.
..आहोत ना ???
महेश देवशोध ( राठोड )
वर्धा , जिल्हा प्रतिनिधी
73 78 70 34 72