आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सूरु करा- आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी
तिरोडा वार्ता:- खरीप हंगाम 2020 मध्ये शेतकऱ्यांचे धान मळणीला आले असून हलक्या प्रतीचे धान कापणे सुरू झाले आहे शेतकऱ्यांना धान विक्री करण्यासाठी कृषिउत्पन्न बाजार समिती मध्ये धान विकावे लागत असून शासकीय दराप्रमाणे धानाची किंम्मत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे यासाठी गोंदिया जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी श्री दिपक कुमार मीना यांना तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजयभाऊ रहांगडाले यांनी दिले