BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

Summary

मुंबई, दि. 7 :- इंग्रज सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारे, देशवासीयांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचा विश्वास, बळ देणारे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं स्थान देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आणि देशवासीयांच्या हृदयात कायम राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजे उमाजी […]

मुंबई, दि. 7 :- इंग्रज सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारे, देशवासीयांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचा विश्वास, बळ देणारे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं स्थान देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आणि देशवासीयांच्या हृदयात कायम राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. मुख्य सचिव सीताराम कुंटे, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज. जी. वळवी, अवर सचिव ललित सदाफुले यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचे, शौर्याचे, त्यागाचे स्मरण करून आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचं शौर्य, पराक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी, अभिमानास्पद आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक योद्ध्यांना, क्रांतिवीरांना त्यांनी प्रेरणा दिली. देशाचं स्वातंत्र्य, एकता, अखंडता सार्वभौमता कायम राखणे, देशाचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहणे, हीच राजे उमाजी नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *