हेडलाइन

आदिवासी बाहूल भागातील बंदकरण्यात आलेल्या शाळा सुरू करा हो!!!

Summary

सलील देशमुखांचे शिक्षण मंत्री व शिक्षण विभाचे मुख्य सचीवांना अहमदनगर /उदापुर शाळे करिता निवेदन काटोल/कोंढाळी-/नरखेड /प्रतिनिधी – शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे सरकारचे धोरण आहे. ते लक्षात घेऊन शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायला हवे. सरकारने शाळा बंद करू नयेत. […]

सलील देशमुखांचे
शिक्षण मंत्री व शिक्षण विभाचे मुख्य सचीवांना अहमदनगर /उदापुर शाळे करिता निवेदन
काटोल/कोंढाळी-/नरखेड /प्रतिनिधी –
शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे सरकारचे धोरण आहे. ते लक्षात घेऊन शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायला हवे. सरकारने शाळा बंद करू नयेत. त्याऐवजी विद्यार्थ्यांची उपलब्धता आणि त्यांची गुणवत्तावाढ यावर भर देऊन शाळांना सक्षम करावे.असे मत नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी मांडत नागपूर जिल्ह्यातील काटोल तसेच नरखेड तालुक्यातील अहमदनगर व उदापूर येथील शासनाचे चूकिचे धोरणात्मक निर्णयाचा चूकीचा अर्थ लावून काही शिक्षकांनी शिक्षण विभागाला चुकीचा अहवाल सादर करण्याचे कारणाने दोन शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यातील अहमदनगर ची शाळा बंद झाल्याने येथील विद्यार्थ्यांना तिन कि मी पायदळ ते ही हिंस्त्र वन्य प्राणी (वाघ/बिबट/भालू) यांचा सदैव या भागात वावर असतो. या साठी अहमदनगर व असाच काहिसा प्रकारे उदापूर ची जि प‌ प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
दोन्ही बंद शाळा सुरू करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी मागील २०२१पासून नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी यांना पिडीत विद्यार्थी व पालक यांचे सोबत भेटून शाळा सुरू करण्यासाठी मागणी केली होती. यावर तात्पुरती व्यवस्था करण्यात आली मात्र अजूनही आदिवासी बाहूल भागातील शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. एकदा शाळा बंद करण्यात आली तर त्या शाळेचा यू-डायसनंबर संपुष्टात येत असल्याने एकदा बंद झालेले शाळा सुरू करण्यासाठी परत गल्ली ते दिल्ली गाठावी लागते.
आता काटोल ची अहमदनगर व नरखेड ची उदापूर च्या शाळा सुरू करण्यासाठी सलील देशमुख सतत प्रयत्नशील आहेत. परत शिक्षण केंद्र प्रमुख ते शिक्षण प्रधान सचिव ते राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना भेटून पुर्ण प्रयत्न केले जात आहे मात्र बंद करण्यात आलेली शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे यु -डायस क्रंमाक ‌मिळविण्यासाठी लागणारी नियमावली नुसार आता दिल्ली गाठावी लागणार की काय?असा ही सवाल उपस्थित होत आहे.या साठी ही जि प सदस्य सलील देशमुख यांनी तयारी दर्शवली आहे.
खरे तर!शिक्षणाची गंगा घरापर्यंत, दारांपर्यंत पोहोचविण्याचे धोरण हे कधीही स्वागतार्हच म्हणावे लागेल. आपल्या ग्रामीण महाराष्ट्रासाठी अशा धोरणाची निकड आहे. ज्ञानोपासनेचा तसेच निर्माण होणाऱ्या या संधींचा विचार हा तर सतत आपल्या शिक्षणाच्या केंद्रवर्ती राहिला पाहिजे. आता ज्ञानोपासना किती होते आणि संधी कितीशा उपलब्ध होतात; हा पुन्हा चिंता, चिंतनाचा निराळा मुद्दा आहे.
काटोल विधानसभा मतदारसंघातील दोन्ही शाळा सुरू करण्यासाठी सलील देशमुख यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर तसेच राज्याचे शिक्षण प्रधान सचिव कुंदन यांना भेटून बंद शाळा सुरू करण्यासाठी मागणी निवेदन दिले आहे. या प्रसंगी नरखेड पं स सदस्य मयुर उमरकर सोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *