आदिवासींची वाट खडतरच

{पुसागोंदी ते घुबडी सडकेची दुर्दशावाईट रस्त्यामुळे दुचाकी, तीन चाकी, चारचाकी तसेच एस टी महामंडळाच्या बस सेवा ते शेतकर्यांचे शेतमाल वाहतूक करणारी वाहन चालकांचाही नकार या भागातील ग्रमस्थांवर पायी प्रवास करण्याची वेळ येते असते}
पुसागोंदी ते घुबडी रस्त्याची दुर्दशा
खड्डेमय रस्त्यामुळे प्रवासी व मालवाहतूक चालकांचाही नकार
ग्रमस्थांवर पायी प्रवास करण्याची वेळ
वार्ताहर-कोंढाळी
काटोल तालुक्यातील पुसागोंदी ते घुबडी या आदिवासी व भटक्या विमुक्त जमातींच्या ग्रामीण भागातील पाच किलोमीटरच्या रस्त्याची(सडकेची) गेल्या काही वर्षांपासून पुरती दुर्दशा झाली आहे. दोन गावे आणि तिन आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या या एकमेव रस्त्याचे अस्तित्वच खड्डेमय झाले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना याच दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून गेली अनेक वर्षे खडतर प्रवास करण्याची वेळ आली आहे, मात्र पंचायत समिती आणि राजकीय नेत्यांना या रस्त्याकडे लक्ष देणे गरजेचे वाटत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांवर वाहनांअभावी पायीच प्रवास करण्याची वेळ आली आहे.
काटोल तालुक्यातील आदिवासी भागातील लहान-मोठी अनेक गावे मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहेत. गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाच्या सोयीचा विकास करण्याचा विसर बहुदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पडला आहे. तालुक्यातील कोंढाळी-पुसागोंदी घुबडी आणि खापा सोनार, धुरखेडा, कामठी -धोतीवाडा खापा त्याला लागून असणाऱ्या या आदिवासी वाड्यांना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. मात्र या रस्त्याची दुरुस्ती गेली अनेक वर्षे प्रशासनाने केलीच नाही, त्यामुळे वाहनांच्या रहदारीमुळे या मार्गावरील संपूर्ण रस्ता उखडला गेला आहे. रस्त्यावर सर्वत्र फक्त दगड आणि मातीच उरली आहे, त्यामुळे वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहन चालवणे मोठे जिकिरीचे बनले आहे. दुचाकी वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे येथील खड्यात अनेक अपघात ही होत आहेत, त्यात आदिवासी वाडीत एखादा नागरिक आजारी फार कठीण झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिका आणि दळणवळणासाठी एकमेव पिक अप वरअवलंबून रहावे लागते. मात्र खराब रस्त्यांमुळे पिक अप चालकही या भागात येण्यास नकार देतात. त्यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पायीच प्रवास करण्याची वेळ आली आहे.अशी माहिती घुबडी च्या सरपंच शीला कौरती, उपसरपंच विजय डेहणकर, पुसागोंदी चे उपसरपंच हरिष राठोड, माजी सरपंच रामचंद्र चव्हाण, रा का युवक काँग्रेसचे तालुक्यातील अध्यक्ष प्रशांत खाते यांनी व घुबडी या गावाला जाणाऱ्या या मार्गावरील प्रवास करणारे अनेक नागरिक सांगितले आहे,की त्यामुळे भविष्यात या भागातील दोन गावे आणि चार आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता दुरुस्ती प्रशासनाने तात्काळ करावी, अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक
बांधकाम अधिकारी यांना विचारले असता, त्यांनी हा रस्त्यावर खड्डे पडले असून त्याची दुरूस्ती गरजेचे आहे, मात्र निधी आभारी दुरूस्ती बांधकाम झाले नाही. तसेच, निधी मंजूर झाल्यानंतर लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, अशीही माहिती दिली.