हेडलाइन

आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्र प्रतिनिधी

Summary

विषय:- आपणास काय म्हणून मतदाराने मतदान केले पाहिजे बाबत. महोदय उपरोक्त विषय फार गंभीर असून,आपणास ह्या पत्राच्या निमित्ताने काही प्रश्न विचारावे वाटले.हे प्रश्न केवळ माझे आहे असे समझु नका तर हे चंद्रपूर- वणी- आर्णी क्षेत्रात असलेल्या जनतेशी संबंधित आहे. (1) […]

विषय:- आपणास काय म्हणून मतदाराने मतदान केले पाहिजे बाबत.

महोदय उपरोक्त विषय फार गंभीर असून,आपणास ह्या पत्राच्या निमित्ताने काही प्रश्न विचारावे वाटले.हे प्रश्न केवळ माझे आहे असे समझु नका तर हे चंद्रपूर- वणी- आर्णी क्षेत्रात असलेल्या जनतेशी संबंधित आहे.

(1) प्रश्न :- महोदय आपण मोठ्या जोमाने बिंबीच्या देठापासून प्रभावी भाषण करता,अभ्यासू मत मांडता पण अशाच पद्धतीने *विदर्भ वेगळा* हा मुद्दा का विसरलात? जेव्हाकी 2019 मध्ये हा नारा आपण अति प्रखरतेने पुढे आणला होता व विदर्भातील जनतेला मते मागितली होती आपल्या पक्षासाठी.

(2)प्रश्न:- महोदय आपण सातत्याने महाराष्ट्र सरकार मध्ये वन मंत्री आहात ,ताडोबाच्या नावाखाली प्रसिद्धी चांगलीच मिळविली.परंतु ताडोबा परिसरात असणाऱ्या गावांचे पुनर्वसन जे केले त्या पुनर्वसित लोकांना खरंच योग्य मोबदला दिला का हो? आणी त्या परिसरात आदिवासी लोकांच्या जमिनी सर्व भांडवलदारासाठी मोकळ्या केल्या. त्या बिचाऱ्या गरजू घटकांचे काय झाले त्यांच्याकडे रोजगार आहे का? ते रोज वाघाचे शिकार का म्हणून होतात ? तुम्ही सचिन तेंडुलकर आणी रविना टंडन सारख्या सेलिब्रेटी साठी ताडोबा परिसरात जागा उपलब्ध व्हावी म्हणूनच आदिवासी लोकांचे पुनर्वसन केले काय? आज ताडोब्यातील मूळ रहिवासी बाजूला गेला आणी तुमच्या मतातला भांडवलंदार तिथे जाऊन जमिनदार बनला हे कसे व का म्हणून?

(3)प्रश्न:- आपण ज्या जिल्ह्यात सातत्याने निवडून आलात त्या जिल्ह्यात गोंडराज्याचा वाडा (जिल्हा कारागृह) इथे क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची शहीद भूमी पण आपण अनेकदा जिल्ह्याचे पालकमंत्री असून तो जिल्हा कारागृह तिथून हलविण्यासाठी प्रयत्न केला नाही.कधीही एक आदिवशींचे समाजभवन निर्माण व्हावे असे प्रयत्न केले नाही.उलट सांस्कृतिक परकोट ज्याला पुरातत्व विभाग अनुमती नाकारतो तिथे तुम्ही श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृह होऊ दिला.त्या जिल्हा कारागृहात नुकतीच 12 मार्चला शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची आदिवासी समाजातर्फे जयंती साजरी झाली.पण आपण तिथे दर्शनालाही नाही आले किंवा जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या नाही.अल्पसंख्याक असलेल्या समाजाच्या जयंत्या पुण्यतिथ्या तुमच्या लक्षात राहतात आणी आदिवासी समाजा बाबत उदासीनाता का म्हणून? बर 12 तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोटनिकल गार्डनच्या उदघाटनाला 11 तारख्येवरून 12 ला बोलाविले आदिवासी समजाला वाटले होते की,सुधीरभाऊ ह्यावेळेस तरी मुख्यमंत्र्याला त्या शहीद भूमीवर आणेल पण नाही. *तुमचा आदिवासी समाजावर राग का व कशासाठी?*

(4)प्रश्न:- चंद्रपूर व वणी एरियात मोठ्या प्रमाणात खनिज उतखणन होत आहे.तिथे आदिवशींच्या जमिनी हेतूपुरसर बळकाविल्या जात आहे.यांच्या बाबत पालकमंत्री म्हणून तुम्हाला काहीच कसे माहित नाही.अनेक निवेदने देऊन आपण उपययोजना का केली नाही?

(5)प्रश्न:- चंद्रपूर वणी भागात प्रचंड प्रदूषण वाढले कशामुळे ? वायू प्रदूषणामुळे इथल्या लोकांचे आयुष्य कमी झाले आहे त्यावर आपण झाडे लावली तर ती झाडे गेली कुठे ? चोरीला गेली की मेली? ती जगली का नाही? त्या कंत्राटदारावर प्रशासनावर कुठली कार्यवाही केली? इथे सर्वात मोठा विज उत्पादक जिल्हा असताना इथल्या स्थानिक जनतेसाठी विज बिलात माफी मिळावी असे आपणास का वाटले नाही?

(6) प्रश्न:- तुम्हाला शिवाजी महाराजाच्या गडाचे सौंदर्यीकरण व मोठे पुतळे उभारण्याचे सुचते आनंदाची बाब आहे. मग इथे गोंडकालिन साम्राज्याचे सौंदर्यीकरण व बाबुराव शेडमाके यांचा पुतळा का नाही?

(7)प्रश्न:- रामाळा तलावाचे कितीदा कंत्राट आणी कितीदा केवट बोट डुबेल हे तरी सांगा.की रामाळा तलावाचा प्रश्नच सुटणार नाही? त्यामुळे होणारे जल प्रदूषण व वायू प्रदूषण सुटेल की नाही.तिथल्या आत्महत्या कधी थांबेल? यावर तुमचे पालकमंत्री लक्ष का नाही?

(8)प्रश्न:- बाबूपेठचा पूल का म्हणून झाला नाही? बाबूपेठ व भिवापुरच्या लोकांना अजून किती मनक्याचा त्रास व दुचाकी अपघात व परिणामी नाहक त्रास भोगायला लावणार आहात तुम्ही?

(9)प्रश्न:- चंद्रपूरातील स्थानिक लोकांना चंद्रपूर औद्योगिक जिल्ह्यात किती टक्के भागीदारी दिली व बेरोजगारी संपविण्यासाठी काय पर्याय केले म्हणून इथला स्थानिक रोजगारा पासून वंचित आहे व म्हणून तो आत्महत्या करतोय ? तसेच चंद्रपूरात सर्रास गुन्हेगारी वाढण्या मागाचे कारण काय?

(10) प्रश्न:- मंदिरे बांधा ,जरूर इथून लाकड संसदेत पाठवा किंवा अयोध्येला पाठवा वाघनख आणायचे जरूर आणा त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही.पण ताडोबा महोत्सवात 12 करोड रुपये झाला करून त्यातून स्थानिकांना काही फायदा होत नसेल तर हे सर्व स्टंटबाजी आहे काय? शेतकरी महोत्सवात कृषी मंत्र्याची वरात रथावरून चांगली होती पण त्यांनी चंद्रपूरच्या हिताचे काय निर्णय घेतले? त्या स्मार्ट योजनेमुळे इथला शेतकरी किती त्रस्त आहे याचा कधी विचार केला का तुम्ही?

(11)महिलांचे,युवकांचे ,शिक्षणाचे,आरोग्याचे,रोजगाराचे प्रश्न जर मंदिरातूनच सुटणार असतील तर असे स्पष्ट सांगा ना? जर नाही तर बेसिक गोष्टी व दिलेले आश्वासन पूर्ण कधी कसे होईल व लोकसभेत निवडून येऊन ते तुम्ही सोडविणार का हा प्रश्न स्वतः ला विचारा.

महोदय उपरोक्त 11 मुद्दे हे तुम्हाला तुमच्या लोकसभेसाठी 11 रुपयाची दक्षिणाचं समजा. कारण मी एक सर्व सामान्य चंद्रपूरकर आहे.मला आपल्याकडून अनेक अपेक्षा आहे.ज्या अनुतरीत आहे म्हणून मी हे लिहिण्याचे धाडस करतोय.शिवाय मी आदिवासी समाजाचा जबाबदार प्रतिनिधी असल्याने चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात असलेल्या 6,50000 आदिवासी मतदारा साठी आपण काय निश्चित करता व काय ठोस आश्वासन देता.तुमच्या पक्षाची निती बाजूला सारूनही तुम्ही स्थानिकासाठी काय उपययोजना करता हे ह्या लेखणी मागचा उद्देश आहे. मी कुठेही तुमचा वयक्तिक विरोधी नाही.पण तुमचा पक्ष संविधान तत्वाला मानत नाही तर मनुवाद तत्व पाडतो त्यामुळे तुम्ही बहुजनाना काय संदेश देता म्हणजे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा ह्या हेतूने मी ही लेखन केलेले आहे.

करिता गैरसमज नसावा.वास्तववाद पुढे ठेवावा.ही विनंती

आपलाच
भोला संभाजी मडावी
मी एक वास्तववादी तथा हवालदिल चंद्रपूरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *