आता एका क्लिकवर ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक दिगंबर गभने यांची उल्लेखनीय कामगिरी
Summary
मोहीडी (प्रतिनिधी): तालुक्यातील वरठी ग्रामपंचायतीने डिजिटायझेशनच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचा सर्व कारभार आता एका क्लिकवर उपलब्ध झाला असून, यामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामसेवक गभने यांनी आपल्या कल्पक आणि नियोजनबद्ध […]

मोहीडी (प्रतिनिधी):
तालुक्यातील वरठी ग्रामपंचायतीने डिजिटायझेशनच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचा सर्व कारभार आता एका क्लिकवर उपलब्ध झाला असून, यामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामसेवक गभने यांनी आपल्या कल्पक आणि नियोजनबद्ध कार्यशैलीमुळे सर्व विभागांतील नोंदी, योजनांचे अहवाल, निधी वितरण, दाखले व आवश्यक दस्तऐवज सुसंगतरीत्या फाईल करून संकलित ठेवले आहेत. या कागदपत्रांचे रंगनिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे काही क्षणात हवी ती माहिती किंवा कागदपत्र उपलब्ध होते.
एकाच क्लिकवर संपूर्ण माहिती
वरठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आता उत्पन्न प्रमाणपत्र, जात दाखला, अधिवास प्रमाणपत्र, कर भरणा, पाणीपुरवठा, शौचालय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, १४ व १५ वा वित्त आयोगाचा निधी अशा विविध योजनांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध आहे.
प्रशंसनीय उपक्रम
ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्या कल्पकतेमुळे ग्रामपंचायत कार्यालय एक आदर्श डिजिटल कार्यालय ठरत आहे. ही प्रणाली इतर ग्रामपंचायतींनाही मार्गदर्शक ठरू शकते. पारदर्शक, जलद व अचूक कारभारामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचत आहेत.