आजारापेक्षा औषधच घातक ठरू नये… मदन गायकवाड
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी. चक्रधर मेश्राम दि. 2 मे. 2021
प्रसारमाध्यांनी कोरोना ची भीती जनमाणसात निर्माण केली असून होणारे प्रत्येक मृत्यु हे कोरोनामुळेच होत आहे असं वारंवार सांगण्यात येत आहे…
आज पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल आहेत त्यामुळे न्युज चॅनेलवर कोरोना दिसणार नाही . उद्यापासून परत तेच सुरू होईल. या देशात सुरूवातीला कोरोना पॉजीटिव्ह पेशंट फक्त पॅरासिटामल या गोळ्यानी बरे होऊन घरी येत असतांना पाहीले आहे.आता एवढ्या मोठ्या प्रमाणात औषध घेऊनही का मरत आहेत…?? असा प्रश्न सर्वाधिक सतत पडला आहे. दवाखान्यात मरण पावलेल्या प्रत्येक पेशंट चं इन कॅमेरा पोस्ट मार्टम होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. हि आवश्यकता असूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पेशंट चा मृत्यु कोरोनामुळे झाला की औषधामुळे झाला हे माहीत होणे आवश्यक आहे… स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी सुचना दिली आहे की, रेमडेसीवीरच्या इंजेक्शनचे दुष्परिणाम होऊ शकतात.
आजारापेक्षा औषधच घातक… ठरू नये याची काळजी घेणे महत्वाचं आहे.असे मत मदन गायकवाड यांनी व्यक्त केले.