आजचे राशिभविष्य २२-०३-२०२१ By पोलीस योद्धा न्यूज रविवार, २१ मार्च, २०२१ आजचे राशिभविष्य २२-०३-२०२१
मेष :-
आजचा दिवस शुभ फलदायक आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतिम निर्णय घेणे जमणार नाही. म्हणून आज कोणताही निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सांगतात. कामानिमित्त किंवा काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. लेखनकार्य करण्यास चांगला दिवस आहे. बौद्धिक व तार्किक विचारविनिमय होईल. कोणाही स्त्रीशी वादविवाद करू नका.
वृषभ :-
आज मन स्थिर ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. कारण चंचल मनोदशेमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समझोता करण्याची दृष्टी ठेवलीत तर कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासाचे बेत आखू नका. लेखक, कलाकार तथा सल्लागार यांच्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवे काम आरंभ करू नका.
मिथुन :-
लक्ष्मीची कृपा असल्यामुळे आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. स्वादिष्ट व रूचकर भोजन, वस्त्रालंकार तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया अत्यंत आनंदाचा दिवस. तब्बेत चांगली राहील. खर्च वाढणार नाही यांकडे लक्ष द्या. भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. निषेधार्ह विचार मनात येऊ देऊ नका.
कर्क :-
आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका अशी सूचना श्रीगणेश देतात. संबंधित व्यक्तींशी मतभेद होतील. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणी वर संयम ठेवा. मनातील साशंकता दूर करा. तब्बेतीकडे लक्ष द्या. मानहानी आणि वित्तहानी पासून जपून राहा.
सिंह :-
श्रीगणेश आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे सांगतात. स्त्रिया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तिमुळे हाती. आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विचार करण्यात खूप वेळ जाईल. आर्थिक लाभाचे योग आहेत.
कन्या :-
शुभ फल प्राप्तीचा दिवस. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी आणि नोकरदारांसाठी दिवस फारच चांगला आहे. व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीचे योग आहेत. पित्याकडून लाभ होण्याची शक्यता. घरात आनंदी वातावरण राहील.
तूळ :-
व्यावसायिक क्षेत्रात लाभांचे संभव श्रीगणेश वर्तवितात. नोकरी आणि व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरचे प्रवास किंवा तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे बेत ठरवाल. लेखनकार्य आणि बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र व नातलगांकडून आनंद देणार्या बातम्या समजतील. शारीरिक अस्वास्थ्य राहील.
वृश्चिक :-
आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवा असा श्रीगणेशांचा तुम्हाला सल्ला आहे. नवीन कामात अपयश येण्याचे योग असल्याने नवीन कामे सुरू करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. सरकार विरोधी प्रवृत्तींपासून दूर राहा. खर्च वाढल्याने आर्थिक संकटाचीही शक्यता आहे.
धनु :-
श्रीगणेश म्हणात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांबरोबर एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी अनुकूल दिवस. भागीदारीतून फायदा होईल.
मकर :-
व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभप्रद आहे असे श्रीगणेशांचे म्हणणे आहे. व्यवसायात तुम्ही ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. पैशाच्या देण्या घेण्यातूनही यश मिळेल. व्यापारातून संबंधित कामात विघ्न येईल. स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. सहकार्यांचे सहकार्य देखील मिळू शकते.
कुंभ :-
आपले विचार व बोलणे यात बदलाव येईल. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. ध्यान, लेखन व सृजनात्मकता यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उद्भवतील. अपचन व अजीर्ण अशा आजारातून स्वास्थ्य बिघडू शकते असे श्रीगणेशाचे म्हणणे आहे.
मिन :-
श्रीगणेश म्हणतात की आज आपल्यात स्फूर्ती आणि उत्साह कमी असेल. कुटुंबियांशी वादविवाद न करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. शरीर व मन अस्वस्थ असेल. अप्रिय घटनांतून आपले मन दुःखी होईल. नोकरीत काळजी. पैसा व कीर्ती यांची हानी होणार नाही याकडे लक्ष द्या.
✍️ प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991