नागपुर पर्यावरण महाराष्ट्र हेडलाइन

आई पिलांच्या शोधात चिखली शिवारात मादी बिबट आपल्या पिल्लां साठी परत आली,आई आपल्या सोबत पिल्लांना घेऊन गेली. कोंढाळी वनपरिक्षेत्रातील चिखली येथे वन विभागाकडून यशस्वी प्रयत्न

Summary

कोंढाळी – कोंढाळी वनपरिक्षेत्रातील चिखली गावाजवळील शेतकरी सागर शेलोकर यांच्या शेतात दिनांक 18 जुलै रोजी मादी बिबट आपल्या तीन इवल्याशा पिल्लांसह दिसून आली. वन्यप्राण्याचे दर्शन होताच गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे मादी बिबट तातडीने एका पिल्लाला घेऊन शेतातून निघून गेली, […]

कोंढाळी –
कोंढाळी वनपरिक्षेत्रातील चिखली गावाजवळील शेतकरी सागर शेलोकर यांच्या शेतात दिनांक 18 जुलै रोजी मादी बिबट आपल्या तीन इवल्याशा पिल्लांसह दिसून आली. वन्यप्राण्याचे दर्शन होताच गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे मादी बिबट तातडीने एका पिल्लाला घेऊन शेतातून निघून गेली, तर उर्वरित दोन पिल्ले त्या ठिकाणीच राहून गेली. या घटनेची माहिती चिखली चे सरपंच राजकुमार चोपडे व पोलीस पाटील कमलेश धोटे यांनी या घटनेची माहिती कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण नाईक यांना दिली. कोंढाळी वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चिखली येथे घटनास्थळी पोहोचले तेथील परिस्थिती पाहून वन विभागाचे वरिष्ठ अधिकार्यांना घटनेची माहिती दिली.
वनविभागाची तत्परता
या घटनेची माहिती मिळताच उप वनसंरक्षक विनीता व्यास यांचे मार्गदर्शनाखाली
कोंढाळी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी व ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) चे रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पिल्लांना शोधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यानंतर मादी बिबट व तिच्या तिसऱ्या पिल्लाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात व्यापक गस्त घालण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. या प्रकरणी
अधिकाऱ्यांचा नियोजनबद्ध निर्णय
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश फुलसुंगे यांनी सहाय्यक वनसंरक्षक श्री पांडुरंग पखाले, कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक, TTC समन्वयक कुंदन हाते यांच्याशी चर्चा करून उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास (नागपूर वनविभाग) यांच्याकडून पिल्लांचे पुनर्मिलन करण्याची परवानगी घेतली.या नंतर घटनास्थळी उपस्थित वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी व वन अधिकारी यांनी
पुनर्मिलनाची प्रक्रिया सुरू केली यात
सदर दोन पिल्लांना प्लास्टिक कॅरेटमध्ये ठेवून त्याच ठिकाणी पुनर्प्रस्थापित करण्यात आले. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली. गावकऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी व पिल्लांना धोका टाळण्यासाठी कर्मचारी दूर राहून गस्त घालत होते. यादरम्यान 19जुलै चे पहाटे अंदाजे चार वाजता चे सुमारास मादी बिबट परत आली व तिने कैरेट उलटवून एकामागोमाग एक करून दोन्ही पिल्लांना उचलून सुरक्षित स्थळी घेऊन गेली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचे सांगितले जाते. तरीही आई व पिल्लांमध्ये यशस्वी पुनर्मिलन झाल्याने वनविभागाचे प्रयत्न यशस्वी ठरले आहे.
या संपूर्ण मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रवीण नाईक, TTC टी सी सी समन्वयक कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर मरस्कोल्ले, श्रीकृष्ण आसोले (वनपाल, TTC), निलेश तवले, अरुण मालके, बंडू मंगर, चेतन बारस्कर, स्वप्नील भुरे, किशोर चव्हाण, सुनील शिसोदे, तुकाराम राठोड, अमोल गडगिले,मेघा धनोडे, नंदकिशोर धोटे, पुंडलिक सरोदे,‌किशोरकुसळकर यांचे सह चिखली गावचे सरपंच पोलिस पाटील ‌व समस्त गावकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले.ही घटना वन्यजीव संरक्षणासाठी लोकसहभाग आणि वनविभागाच्या संवेदनशीलतेचा आदर्श उदाहरण ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *