आंबेडकर नगर वार्डातील शिव मंदिर परिसरात साफ सफाई करा- रेखा कैथल
घुग्घुस शहरातील आंबेडकर नगर (शास्त्रीनगर) वसाहतीत शिव मंदिर आहे याठिकाणी वार्ड वासिय पूजा करण्यासाठी जातात. दोन दिवसानंतर महाशिवरात्रीचा उत्सव आहे या दिवशी मंदिरात विविध कार्यक्रम पार पडते.
परंतु मंदिराच्या परिसरात घाण कचरा पसरलेला आहे तसेच शेजारील लोक याठिकाणी कचरा फेकतात त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
ही समस्या लक्षात घेत राष्ट्रीय बजरंग दलाच्या चंद्रपूर जिल्हा महामंत्री रेखा कैथल यांनी शिष्टमंडळासह नगर परिषद कार्यालयात निवेदन दिले व साफ सफाई, सौंदर्यीकरण व वाल कंपाउंड करण्याची मागणी केली.
यावेळी राहुल बुनकर, पिंटू वनकर, हृदय तांड्रा, रोहित भगत, मंगेश मुंजेवार व वार्ड वासिया उपस्थित होते.
