आंबेडकरी अस्मितेच्या लढ्यातील शहिद भिमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्री. शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी येथे तृतीय वर्षात शिकत असणारे विद्यार्थी सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे.
सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांच्यावर दगड फेकीचा खोटा आरोप करून नवा मोंढा पोलिस स्टेशन, सुपर मार्केट, परभणी मध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते, त्यादरम्यान जातियवादी पोलिस यंत्रणेने त्यांचा बळी घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील ‘भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची’ विटंबना केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या *सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी* यांच्यासह अनेक निरपराध विद्यार्थ्यांवर व समाजातील गोरगरीब, निरपराध लोकांवर जातियवादी परभणी पोलिस यंत्रणेकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुळचे लातूर येथील रहिवासी असलेले सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी हे भोसरी, पुणे येथून परभणी येथे श्री. शिवाजी विधी महाविद्यालयात LL.B. चे शिक्षण घेण्यासाठी आले होते. सध्या ते शंकर नगर, परभणी येथे वास्तव्यास होते. विशेष म्हणजे डोक्यावरील वडीलांचे छत्र हरवले असतानाही जिद्दीने कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी धडपडत होते. कायद्याचे शिक्षण पूर्ण करून आपले सामाजिक दायित्व निभावण्याचा त्यांचा मानस होता. मात्र दुर्दैवाने कायद्याच्या रक्षकांनीच या होतकरू तरुणाचा कोठडीत मारहाण करून बळी घेतला आहे.
एका निरपराध, होतकरू विद्यार्थ्याला कोठडीत मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या परभणी पोलिस दलाचा धिक्कार असो
आंबेडकरी अस्मितेच्या लढ्यातील शहिद भिमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील हत्येचा तपास CBI मार्फत करण्यात येऊन दोषी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.