BREAKING NEWS:
क्रीड़ा महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी बोधचिन्ह (LOGO) स्पर्धेचे आयोजन

Summary

मुंबई, दि. २२ : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, आकर्षक, कल्पक आणि रचनात्मक बोधचिन्ह 31 ऑक्टोबर 2021 पूर्वी isumharashtra@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. या स्पर्धेची अधिक माहिती https://sports.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन […]

मुंबईदि. २२ : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असूनआकर्षक, कल्पक आणि रचनात्मक बोधचिन्ह 31 ऑक्टोबर 2021 पूर्वी isumharashtra@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. या स्पर्धेची अधिक माहिती https://sports.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.  

ऑगस्ट 2021 महिन्यात बोधचिन्ह  स्पर्धा घेण्यात आली होती. योग्य प्रवेशिका प्राप्त न झाल्याने सदर स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. नव्याने बोधचिन्ह (LOGO) तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नव्याने आयोजित स्पर्धेमध्ये या पूर्वी झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक देखील सहभागी होऊ शकतात.

अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करून उत्तम क्रीडा मार्गदर्शक तयार करणेक्रीडा क्षेत्रात कुशल मनुष्यबळविज्ञान व तंत्रज्ञान यामाध्यमातून क्रीडा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध अभ्यासक्रम “आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’’ महाराष्ट्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे सुरु करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या सहभागाच्या दृष्टीने नियम व अटी साठी शासनाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर2021 आहे. स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत..

            निवड समितीच्या शिफारशीनुसार प्रथम क्रमांकाचे बोधचिन्ह LOGO) सादर करणा-या प्रवेशिकेस रु. १,००,०००/- (रुपये एक लक्ष मात्र) इतके रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. बोधचिन्ह (LOGO) स्व‍िकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार आयुक्तक्रीडा व युवक सेवापुणे यांना राहतील. बोधचिन्ह (LOGO) पाठवताना कोरल ड्रॉ, Psf, JPEG स्वरुपात पाठवावेबोधचिन्हावर कोणत्याही प्रकारे नांवक्रमांक किंवा ओळख दिसून येईल अशा कोणत्याही बाबी नमूद केल्यास ती प्रवेशिका अपात्र ठरेल. बोधचिन्ह (LOGO) तयार करताना ते मूळ स्वरूपात व स्वतः तयार केलेला असावा.

स्पर्धकाने बोधचिन्ह (LOGO) डिझाईन पाठवताना त्याचे नांवनिवासाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व आपला ई-मेल पाठविण्यात आलेल्या ई मेलमध्ये नमूद करावा. बोधचिन्ह (LOGO) पाठवतांना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या isumaharashtra@gmail.com या ई मेल वर पाठवावाअन्य ई-मेलवर पाठविण्यात आलेल्या प्रवेशिका ग्राह्य असणार नाहीत. अधिक माहितीसाठी क्र.९७३०२००६५६ श्री.उदय पवारतालुका क्रीडा अधिकारीपुणे, यांना संपर्क करावा.

या स्पर्धेत जाहिरात क्षेत्रात कार्यरत एजन्सीजडिझाईनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीज तसेच ग्राफीक क्षेत्रात काम करणा-या एजन्सीज देखील भाग घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा बोधचिन्ह (LOGO) क्रीएटीव्ह असावासेल्फ मेड असावात्यात रचनात्मकता असावी. तसेच त्यातून उद्देश स्पष्ट होणे आवश्यक आहे. केवळ भारतीय व्यक्तीस स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेत परदेशात राहणारे मूळ भारतीय असणाऱ्या व्यक्तीस देखील सहभागी होता येईल. लोगो ( बोधचिन्ह ) A/ 4 साईझ कागदावर असावे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मिशन (Mission) संशोधनप्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता गाठणे.  क्रीडा विद्यापीठ दृष्टीकोन (Vision) : खेळ व तंदुरुस्तीच्या विकासासाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक यंत्रणा तयार करणे. क्रीडा विद्यापीठ ध्येय (Motto): क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत हे क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून परिचित व्हावे.

क्रीडा विद्यापीठ उद्दीष्टे (Objectives) :

भारतामधील अव्वल खेळाडूंना अद्ययावत वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन पाठिंबा देणे.

क्रीडा कामगिरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करणे.

प्रशिक्षित क्रीडा व्यावसायिकांचा विकास करणे.

क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे.

क्रीडा प्रशिक्षक व संबंधितांना नियमित प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे.

आधुनिक स्पर्धात्मक खेळांबरोबरच पारंपारिक देशी खेळांचा विकास करणे,

समाजातील दुर्बल घटकांना क्रीडा नैपुण्यासाठी विशेष प्राधान्याने संधी उपलब्ध करून देणे.

खेळाडू क्रीडा तज्ञकीडा मार्गदर्शकक्रीडा प्रशासक इ. च्या सहकार्याने खेळाचा दर्जा उंचावणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *