अ.भा.रिपब्लिकन पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी :- रामदास धाईंजे
Summary
मौजे मानकी येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास मोतीराम धाईंजे यांची अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माळशिरस(जि.सोलापूर)तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष निंगप्पा गायकवाड यांच्या शिफारसीनुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीणजी खोबरागडे यांनी धाईंजे यांची निवड घोषित केली आहे […]
मौजे मानकी येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास मोतीराम धाईंजे यांची अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माळशिरस(जि.सोलापूर)तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष निंगप्पा गायकवाड यांच्या शिफारसीनुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीणजी खोबरागडे यांनी धाईंजे यांची निवड घोषित केली आहे
रामदास धाईंजे हे परखड व स्पष्ट वक्ते म्हणून माळशिरस तालुक्यात परिचित आहेत धाईंजे यांच्या निवडीचे माळशिरस तालुक्यातील सर्व समाजातून स्वागत होत असून पक्षाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी तालुक्यामध्ये पक्ष बांधणी करून यशस्वीपणे पार पाडू असे निवडी नंतर धाईंजे म्हणाले.
धाईंजे यांच्या निवडीबद्दल रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजस खोबरागडे , पक्षाचे प्रदेश सचिव डी.के.साखरे,जिल्हा अध्यक्ष निंगप्पा गायकवाड ,जिल्हा सरचिटणीस प्रदीप परकाळे ,शहराध्यक्ष आनंद मोरे, जिल्हा महिला अध्यक्ष पद्मिनी शेवडे,पंढरपूर तालुका अध्यक्ष विनोद क्षीरसागर, मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान भोसले, महिला तालुका अध्यक्ष वैशाली सावंत ,मंगळवेढा शहराध्यक्ष मच्छिंद्र (बापू) माने, आदींनी धाईंजे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.