अ.भा.रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
Summary
अ.भा.रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसरात पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्तिथीत साजरा करण्यात आला सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व महामानव […]

अ.भा.रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसरात पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्तिथीत साजरा करण्यात आला सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजातील लोकांना घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले तसेच महाराजांचे कार्य महिला व युवकांना नेहमीच नेत्रदीपक ठरणार आहे. या प्रसंगी केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रतीक डोरलीकर,इंजि,शेषराव सहारे जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर,
महिला.जि.अध्यक्ष मृणाल कांबळे,गीता रामटेके,ज्योती शिवणकर,कल्याणी चंद्रागडे,सुनीता बेताल,अनिता जोगी,दिलीप खाकसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.