BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अश्विनी राऊत यांना पीएचडी पदवी

Summary

कोंढाळी/काटोल-: अश्विनी कृष्णराव राऊत यांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. अश्विनी राऊत यांना नागपूर महानगरपालिकेचे वर्षे २०१४ते२०१९ या कालावधीत लोककल्याणकारी योजनांचा समिक्षात्क अध्ययन या‌ विषयावर संशोधन कार्यासाठी पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. अश्विनी […]

कोंढाळी/काटोल-: अश्विनी कृष्णराव राऊत यांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. अश्विनी राऊत यांना नागपूर महानगरपालिकेचे वर्षे २०१४ते२०१९ या कालावधीत लोककल्याणकारी योजनांचा समिक्षात्क अध्ययन या‌ विषयावर संशोधन कार्यासाठी पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. अश्विनी कृष्णराव राऊत यांनी यापूर्वी भारत सरकारच्या डायस्पोरा‌ निती के उद्भव और विकास का अध्ययन या विषयावर एम . फिल (सुवर्ण पदक) ची पदवी बहाल करण्यात आली आहे. अश्विनी राऊत या अल्प उत्पन्न असलेल्या अत्यंत सामान्य कुटुंबातून येतात. पीएचडी पदवी मिळाल्यानंतर कोंढाळी/काटोल परिसरातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय संघटनांतर्फे अश्विनी यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *