नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अवैधरित्या पशूंची (गोवंशाची) तस्करी करणाऱ्यांची मुसक्या कोण आवरणार? अवैधरित्या (पशूंची) गोवंश तस्कर संगठीत तर गोरक्षकांचा वाली कोण?????? गाईला गोमातेचे राज्य दर्जा फक्त कागदावरच महाराष्ट्र सरकार कधी जागे होणार???? 12 गोवंशासहीत वाहन कोंढाळी पोलीसांचे ताब्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Summary

कोंढाळी- दिनांक २२-जानेवारी चे रात्री दिड ते दोन वाजता चे दरम्यान गोवंशाना‌ वहनातून क्रूरतेन वाहून नेणारे क्रं एम एच -४०-सी टी-४९५४(अशोक लेन्ड) वाहन कोंढाळी -वर्धा टी पॉईंट सामोर विचारपुस करण्यासाठी जनावरांनी भरलेले वाहन थांबविले . या वाहन वहनात नियमबाह्य गोवंश […]

कोंढाळी-
दिनांक २२-जानेवारी चे रात्री दिड ते दोन वाजता चे दरम्यान गोवंशाना‌ वहनातून क्रूरतेन वाहून नेणारे क्रं एम एच -४०-सी टी-४९५४(अशोक लेन्ड) वाहन कोंढाळी -वर्धा टी पॉईंट सामोर विचारपुस करण्यासाठी जनावरांनी भरलेले वाहन थांबविले . या वाहन वहनात नियमबाह्य गोवंश कोंबून भरले असल्याने या प्रकरणी कोंढाळी पोलीसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. मात्र यादरम्यान गोवंशाची नियमबाह्य पद्धतीने अवैधरित्या वाहतूक करणारे काही व्यक्ती तेवढ्या रात्री कोंढाळी पोलीस स्टेशन ला पोहोचले व पकडलेले जनावरे नियमावली प्रमाणे खरेदी केली आहे असे सांगत होते‌.
महाराष्ट्रातील गोवंशाची नियमबाह्य अवैध वाहतूक नियमबाह्य व अवैध असतांना ही करत असतांनाही २२जानेवारी रोजी गोवंशाची कोंबून भरलेले वाहन सध्या कोंढाळी पोलीसांचे ताब्यात आहे. कोंढाळी पोलीसांनी संबंधित वाहनातील 12बैलांना काटोल येथील कोंडवाड्यात जमा के असल्याचे सांगितले जाते.
*गोवंशाची तस्करी थांबता थांबत नाही*
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोवंशाची अवैध पशु तस्करी थांबात नाही. ग्रामीण भागातून जमा केलीली गोवंशांना कत्तलखाण्याकडे नेते असलेले संगठित जनावर तस्कर गोरक्षकांवर भारी पडत असल्याचे चित्र नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसून येते आहे .
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन मधे आधिच मनुष्यबळाची कमी आहे. याचा फायदा गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना फावत आहे.यातच अवैध पशुधन व त्यातही गोवंशाची नियमबाह्य तस्करी थांबता थांबत नाही. उलटपक्षी अवैध पशु तस्कर संगठीत राहून पशू तस्करी जोमात सुरू आहे. याला स्थानिक गावो गावचे कही लोकांचे सहकार्य मिळत आहे. या उलट गोरक्षकांनी कत्तलखान्याकडे नेणारी वाहनांना विचारपुस करण्यासाठी थांबवली तर त्या गोरक्षकांचे जीवावर उठतात.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोवंश पशुधन तस्करीचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा संगठीत गुन्हेगारी करणारे पशू तस्करी करणार्यांकडून गोरक्षकांचे जीवला सतत धोका निर्माण होऊ शकतो एवढं मात्र खरं……..

गोवंशाना क्रूरतेने भरून कत्तलखाण्याकडे नेणारी वाहनांना विचारपुस करण्यासाठी थांबविणार्या गोरक्षकांचे जीवाला धोका झाल्यावरच सरकार ला जाग येईल काय???????
*बैल बाजारातून खरेदी केलेले गोवंश (बैल )*

वाहन क्रं एम एच ४०-सी टी २९५४-मधे एकूण 12गोवंश बैल वाहूननेली जात होती. ही जनावरे काटोल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चे बैल बाजारातू खरेदी केली होती, तसेच 12 बैलांना या वाहनातून वाहतूक करण्यासाठी संबधीतीतांकडे परिवहन अधिकारी आर टी ओ चे‌ वाहतूक नियमांची माहिती देणारे पत्र होते. तसेच‌ वहनातील जनावरांचे आरोग्य चांगले असल्याचे पशू वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाण पत्र ही असल्याचे संबधीतीत पशु बैल विकत घेऊन वाहतूक करणाऱ्या कडे असल्याचे सांगितले जात‌ होते.
या प्रकरणी कोंढाळी पोलीसांनी कोंढाळी चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी, पो उ नि धवल देशमुख, ए पी आय भोजराज तांदूळकर व स्टाप सह संबंधित वाहन व त्यातील 12बैल ताब्यात घेतले असून वाहनातील 12बैलांना काटोल येथील कोंडवाड्या ठेवून वाहन पोलीसांनी पुढील आर टी ओ तसेच पशुधन चिकित्सक वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाण पत्रांची चौकशी साठी वाहन ताब्यात घेऊन संबंधित चालका कडील कागदपत्रे तपासली व संबंधीत विभागाशी संपर्क साधला असता संबंधीत वाहनामधुन वाहून नेत असलेल्या जनावरांना नियमावली विरूद्ध वाहून नेत असल्याचे समजल्यावर या प्रकरणी वाहन चालक ओयश यासीनअली (२४)रा.कटंगी जि. बालाघाट म.प्र याचे विरूद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास ए एस आय भोजराज तांदूळकर करत आहे आहे.

अवैधरित्या पशूंची वाहतूक करणारे वाहन पकडले. त्याचा फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *