चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

अवैद्य वाहतुक रोखण्याकरिता आपचे घुग्गुसात उद्या १४ ऑक्टाेंबरला “वाहतूक बंद” आंदोलन

Summary

चंद्रपूर, (१३ ऑक्टो.) : घुग्गुस शहर हे औद्योगिकरित्या ब-याच मोठ्या प्रमाणात विस्तारले असून दिवसांगणिक जड वाहतूक व अवैद्य वाहतूक या शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यात ही प्रदूषण एक मोठी व गंभीर समस्या आहे. या शिवाय स्थानिक मोठ्या कंपनीत (शहरातुन) नित्य […]

चंद्रपूर, (१३ ऑक्टो.) : घुग्गुस शहर हे औद्योगिकरित्या ब-याच मोठ्या प्रमाणात विस्तारले असून दिवसांगणिक जड वाहतूक व अवैद्य वाहतूक या शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यात ही प्रदूषण एक मोठी व गंभीर समस्या आहे. या शिवाय स्थानिक मोठ्या कंपनीत (शहरातुन) नित्य ये जा करणारे ट्रक व हायवा या मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, सध्याच्या परिस्थितीत शाळा सुरू झाल्या आहे.
विद्यार्थ्यांना शहरातील रस्त्यावरुन धावणा-या ट्रक व हायवा मुळे धूळीशी आणि अपघातांशी सतत सामना करावा लागत आहे. हे सर्व प्रकार बंद व्हावे या साठी आम आदमी पार्टी घुग्गुसच्या वतीने या पूर्वी पोलीस स्टेशनला एक निवेदन सादर करण्यात आले हाेते त्यात प्रामुख्याने अवैद्य वाहतूक व जडवाहन वाहतुक बंद करण्याचे नमुद करण्यात आले हाेते. परंतु पोलीस प्रशासनाने या कडे काळजी पुर्वक लक्ष पुरविले नाही, त्यामुळे येत्या १४ ऑक्टाेंबरला घुग्घुस नगरीत आपच्या वतीने वाहतुक बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदाेलनात जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन आपचे घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बाेरकर यांनी एका पत्रकातुन केले आहे.

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *