अवैद्यरित्या देशी कट्टा बाळगणा-या आरोपीला अटक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणची कारवाई.
कन्हान : – स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण चे पथक कन्हान पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना गुप्त माहीती मिळाल्याने कोळसा खदान नं ६ येथे एका युवका जवळ देशी कट्टा असल्याने पथकाने सापळा रचुन आरोपी राहुल नंदंलाल प्रसाद यांच्या घराची झडती घेतली असता सोप्या मध्ये लोखंडी हँडमेड देशी कट्टा किमंत १० हजार रू. चा अग्नीशस्त्र मिळुन आल्याने आरोपीला देशी कट्टासह अटक करून कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले.
मंगळवार (दि.१७) ला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणचे पथक कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करित असताना गुप्त बातमीदारा कडुन कोळ सा खदान नं ६ येथील एका युवका जवळ देशी कट्टा असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने स्था.गु.शा चे सपो नि जितेंद्र वैरागडे व पथकाने शहानिशा करून राहुल नंदंलाल प्रसाद वय २० वर्ष राह. निरंकारी भवन समोर सापळा रचुन त्याचे घराची झडती घेतली असता घरा तील सोप्या मध्ये होल करून लपवुन ठेवलेला लोखंडी हँडमेड देशी कट्टा किंमत १० हजार रू चा अग्नीशस्त्र मिळुन आला. सदर हत्यारा बाबत आरोपीला परवाना विचारला असता त्याचे जवळ कागदपत्रे मिळुन न आल्याने आरोपी राहुल नंदंलाल प्रसाद ला देशी कट्टा सह पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन सरकार तर्फे सपोनि श्री अनिल राउत स्थानिक गुन्हे शाखा यांचे रिपोर्ट वरून पोस्टे कन्हान येथे आरोपी विरूध्द कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाख ल करून आरोपी ला देशी कट्टा सह पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि श्री सुनिल अंबरते करीत आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नागपु र ग्रामिण चे पोलीस निरिक्षक श्री अनिल जिट्टावार यांचे मार्गदर्शनात सपोनि जितेंद्र वैरागडे, सपोनि अनिल राऊत, पोहवा विनोद काळे, नापोशि शैलेश यादव, पोशि भगत, प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, सत्यशिल कोठारे, चापोहवा भाऊराव खंडाते हयानी यशस्विरित्या पार पाडली.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
