अवकाळीने झाेडपले; वादळी वाऱ्यासह पाऊस वीजेच्या जीवंत तारा तुटल्या जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोन बकर्यांचा मृत्यू राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा आयोजकांची पळा-पळ.
Summary
काटोल/कोंढाळी -वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे उपराजधानी सह काटोल/कोंढाळी तालुक्यांमध्ये सोमवार व मंगळवारी रात्री व पहाटे ठिक ठिकाणी ढगांच्या प्रचंड गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. मंगळवारी पहाटे सुमारे एक तास जोरदार पावसाने झोडपले. कोंढाली राजस्व मंडळात मंगळवारी रात्री रात्री पावसाचा जोर कमी […]
काटोल/कोंढाळी -वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे
उपराजधानी सह काटोल/कोंढाळी तालुक्यांमध्ये सोमवार व मंगळवारी रात्री व पहाटे ठिक ठिकाणी ढगांच्या प्रचंड गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. मंगळवारी पहाटे सुमारे एक तास जोरदार पावसाने झोडपले. कोंढाली राजस्व मंडळात मंगळवारी रात्री रात्री पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी नव वाजेपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसतच होत्या. या दरम्यान वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे काटोल तालुक्यातील जुनापानी भागातील वीजपुरवठा करणाऱ्या वीज खांबावरील जीवंत वीज तारां पडल्या तुटून पडल्या. पावसाचा जोर ओसरल्यावर स्थानिकांनी जनावरांना चराई साठी नेत असतांना जुनापानी येथील संजय गोविंदराव वाढवे मंगळवारी सकाळी 11वाजताचे दरम्यान आपल्या 10बक-यांना चराई साठी नेत असतांना गावालगत च्या शेतांच्या धुर्यावर पडलेल्या जीवंत वीज तारा दोन बक-यांचे पायाखली आल्याने दोन बक-या जागीच तडफडू लागल्या व दोन्ही बक-यांचा जागीच तडफडू मृत्यू झाला.यात बक-या चारायी साठी नेनारा संजय वाढवे याचे दैव बलवत्तर म्हणून मात्र थोडक्यात बचावला.
या घटनेची माहिती वीज अधिकारी श्रीकांत समृद्धवार यांना मिळताच त्यांनी आन डिवटी वीज कर्मचारी अनिल ईटनकर व स़केत राऊत– यांच्या सह घटनास्थळी पोहोचून वीज पुरवठा बंद करून कोंढाळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्निल रेवतकर व सहकारी सुधीर कापसीकर यांनी मृत बक-यां चार घटनास्थळी पंचनामा केला .
जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने मृत बक-यांची मोबदला भरपाई वीज विभागाकडून त्वरीत देण्यात यावी अशी मागणी उत्तम काळे व किस्मत चव्हाण यांनी केली आहे.
*कपाशी व तूरी चे नुकसान*
सोमवार व मंगळवार पडलेल्या अवकाळी पावसाने उभ्या कपाशी चे फुटलेल्या बोंडींच जबर नुकसान झाले असून तुरी चे फुल झडल्याने शेतकऱ्यांना मिळणारे तूर पीकाचे नुकसानी मुळे शेतकर्यांच्या तोंड चा घास हिसकावून घेतला आहे अशी माहिती या भागातील शेतकरी सतीश चव्हाण, उत्तम काळे, सुधीर गोतमारे यांनी दिली आहे. तर गहू व हरभरा पिकाला हा पाऊस पोषक ठरणारा आहे तसेच संत्र्या चे मृग बहार ला फायदा अंबीया बहार चे नुकसान असे ही शेतकरी विरेंद्र सिंह व्यास,प्रकाश बारंगे सांगितले आहेत.
*राज्य स्तरीय शालेय खो खो क्रीडा आयोजना पळापळ*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,म.रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद नागपूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर,नबीरा महाविद्यालय काटोल आणि तालुका क्रीडा संकुल समिती काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 19वर्ष वयोगटातील शालेय मुले/मुली यांची राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा नागपूर जिल्ह्यातील क्रीडा नगरी म्हणून आखल्या जानार्या काटोल येथे 26ते30नव्हेंबर दरम्यान येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. 26नव्हेबर पासून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेची तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र 27नव्हेंबर ला अवकाळी पावसाने झोडपल्याने आयोजकांची त्रेधा तिरपट ऊडाली होती. मात्र क्रीडा नगरी काटोल चे खेळाडू व खो खो खेळाडूंसह येथील क्रीडा प्रेमीं व नबीरा महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनीक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या तसेच आमदार अनिल देशमुख यांच्या समर्थकांनी केलेल्या सहकार्यामुळे नबीरा महाविद्यालयाचे प्रशस्त इनडोअर प्रांगणात या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा थाटात पार पाडत आहेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी सांगितले व क्रीडा नगरी काटोलकरांचे मनापासून आभार मानले. .