क्राइम न्यूज़ चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

अर्ध नग्न अवस्थेत दलीत महिलेला सार्वजनिक रित्या मारहाण

Summary

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चंद्रपूर     अर्धनग्न अवस्थेत दलीत महिलेला चौका चौकात मारहाण केल्याची संतप्त घटना समोर आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी चार आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात पीडित महिलेने […]

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चंद्रपूर
    अर्धनग्न अवस्थेत दलीत महिलेला चौका चौकात मारहाण केल्याची संतप्त घटना समोर आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी चार आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात पीडित महिलेने चंद्रपूर प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आपली व्यथा सांगितली. पीडित महिलेने आठवडाभरात आरोपीला ताब्यात न घेतल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करू असा इशारा दिला.
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी पीडितेवर अत्याचार करण्यात आला. तिने पोलिसांनी तक्रार केली त्याद्वारे पोलिसांत गावातीलच इरफान शेख यांचे विरुद्ध भांडवली कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला. पीडितेचे म्हणणे आहे की जेव्हापासून तिने बलात्काराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हापासून आरोपीचे कुटुंबीय तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर सतत दबाव आणत आहेत. दरम्यान दिनांक २२ जून रोजी आरोपीच्या नातेवाईकांनी पिडितेला गावातील चौकात सर्वांसमोर अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण केली. फाटक्या कपड्यांसह पिडीतेनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या प्रयत्न केला, मात्र तक्रार घेण्याऐवजी तेथे तैनात सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे यांनी पीडितेलाच शिवीगाळ करून हाकलून लावले. पिडीतेचे म्हणणे आहे की वरोरा पोलीस ठाण्यातून सहकार्य न मिळाल्याने तिने थेट नागपुरात जाऊन विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनेवरून वरोरा पोलिसांनी अखेर दिनांक ०९ जुलै रोजी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. शेख रिजवान, शेख मौसिम, शेख दानिश आणि शेख मोहम्मद यांचा समावेश आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप पिडीतेने केला आहे. आरोपी वरोरा पोलीस स्टेशनचे एपीआय चावरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप पीडीतेने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *