महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

अर्थसंकल्पीय अधिवेशनात धान बोनसचा मुद्दा गाजला; प्रति हेक्टर २० हजारांची आ. मुनगंटीवार यांची मागणी

Summary

मुंबई : राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठाम भूमिका मांडत प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर करण्याची आग्रही मागणी केली. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांतील शेतकरी सध्या आर्थिक अडचणींचा […]

मुंबई : राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठाम भूमिका मांडत प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर करण्याची आग्रही मागणी केली. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांतील शेतकरी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असून शासनाने तातडीने दिलासा द्यावा, असे त्यांनी सभागृहात अधोरेखित केले.
मागील वर्षी शासनाने जाहीर केलेल्या धान बोनसचा दाखला देत, शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत व पूर्णपणे मिळणे आवश्यक असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. यंदा बोनस संदर्भात निर्णय घेण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, राज्यमंत्री योगेश कदम यांनी या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन मंत्रिमंडळात याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

धान बोनसच्या मुद्द्यावर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *