महाराष्ट्र हेडलाइन

अमरावती यवतमाळ मार्गावरील वटफळी शिवारात एसटी बस व कारचा अपघातात, कारमधील दोघांचा जागीच मृत्यू, बसमधील व कारमधील १८ प्रवासी जखमी.

Summary

नेर : नेर पासून ८ कि. मी. अंतरावर असलेल्या अमरावती यवतमाळ राज्य महामार्गावरील वटफळी शिवारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व टाटा ट्रॅगो कार यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन व्यक्ती ंचा जागीच मृत्यू झाला तर कार आणि बस मधील […]

नेर : नेर पासून ८ कि. मी. अंतरावर असलेल्या अमरावती यवतमाळ राज्य महामार्गावरील वटफळी शिवारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व टाटा ट्रॅगो कार यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन व्यक्ती ंचा जागीच मृत्यू झाला तर कार आणि बस मधील एकूण अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार सदर अपघात हा सकाळी साडे दहा वाजताचे दरम्यान घडला. राळेगाव आगाराची राळेगाव अमरावती बस क्र. एम एच 06 एस 8826 ही यवतमाळ कडून अमरावती कडे जात होती. तर टाटा ट्रॅगो कार क्र. एम एच 29 बीसी 9173 ही कारंजा( शिंगणापूर) कडून यवतमाळ कडे येत होती. सकाळी १०.३० च्या दरम्यान सदर एसटी बस व कार यांची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील राधेशाम अशोक इंगोले (३०) व रजनी अशोक इंगोले ( ५५) यवतमाळ या दोघा मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील इतर ५ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून या अपघातात गंभीर व किरकोळ जखमी कार व बसमधील सर्व जखमींना नेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर रुग्णालय प्रशासनाने सर्व जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यास
सूचित केले. त्यानुसार अपघातात जखमी झालेले कृष्णा रामचंद्र तोडसाम (५८), रेणूका कृष्णा तोडसाम (४०) रा. ढोकी ता. पांढरकवडा, वनिता राजेन्द्र कढे ( ३८)राजेंद्र यशवंत कढे (४४) जान्हवी राजेन्द कढे ( १४)रा. मसली ता. काटोल, सचिन नारायण शेंद्रे(४०) परवेझ खलील बेग (१७) यवतमाळ, धनंजय माधव निरकटे (४३) ढाणकी, सविता संतोष गावंडे (४५)वैष्णवी संतोष गावंडे (४५) कन्हेरगांव( वाशिम) , शोभा श्रावण काळे (६०) मोझर, रोशन मधुकर बोकडे (३७) नेर, मंगला रामभाऊ मोरले (४६) पायल रामभाऊ मोरले (१७) धनंजय माधव निरकटे (४३) अशी जखमींची नावे असून बस चालकाचे विजय महादेव जाधव तर वाहकाचे अमर जुनगर नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *