“अभ्यास मंत्रा ” स्पर्धा परीक्षा करिता डॉ.जगदिश राठोड यांचे मार्गदर्शन

पुणे: नुकतेच शिक्रापूर येथे एमपीएससी व यूपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षा करिता मार्गदर्शन करताना संमोहन तज्ञ डॉ जगदिश राठोड यांनी विद्यार्थ्यांची एकाग्रता व मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.
सविस्तर वृत्त असे की शिक्रापूर येथील आई प्रबोधनी फाउंडेशन शिक्रापूर येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसे करावे , केलेले अभ्यास लक्षात कसे ठेवावे व परीक्षेत कसे चांगल्या प्रकारे लिहावे , त्याकरिता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आई प्रबोधनी फाउंडेशनचे व्यवस्थापक हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व येथील सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणारे मोठ्या संख्येत उपस्थित होते त्याकरिता संमोहनतज्ञ डॉ जगदिश राठोड यांनी काही प्रात्यक्षिक घेतले व त्यानंतर विद्यार्थ्यांना एकाग्रता कशी वाढवावी, मनोबल कसे वाढवावे , त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या मनाची भक्कम तयारी करून.ठाम निश्चय कसे होऊन आपल्या मनावर नियंत्रण कसे ठेवावे मन हे स्वयंशुद्ध कार्यरत राहून यश प्राप्ती करिता चमत्कारीक कार्य करत असते ते कशाप्रकारे कार्यकर्ते याविषयी सविस्तर माहिती सांगितली आणि हे सांगताना म्हटलं की माईंड मॅनेजमेंट इज द लाईफ मॅनेजमेंट आहे .
या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा अभ्यास हा योग्य प्रकारचा होऊन यश प्राप्त तिकडे जावे असे सांगितले. तर संमोहनतज्ञ जगदीश राठोड सर यांच्या मार्गदर्शनाने आई प्रबोधिनी फाउंडेशनचे अध्यक्ष कर्मचारी व स्पर्धक विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रभावित झाले होते. पर्याय क्रमांक मोठ्या संख्येत स्पर्धक विद्यार्थ्यांची संख्या उपस्थित होते.