BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळत असतांनाच , भाडे वाढ़ प्रस्ताव कशाला ६३सामाजिक बांधिलकीच्या रक्कम यांसह डिझज वरिल सरचार्ज व १७.५०टक्के प्रवास सरचार्ज कमी केल्यास भाडेवाढीची गरज नाही एसटीची १४ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर

Summary

काटोल/कोंढाळी: प्रतिनिधी – बहुजन सुखाय,बहुजन हिताय असे ब्रिद वाक्य घेऊन प्रवासी सेवा देणार्या लाल परिला सद्ध्या तरी बरे दिवस आले आहेत. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना लालपरितू प्रवासादरम्यान अर्धेच तिकीट भाडे द्यावे लागते. तर अर्धे प्रवास भाडे राज्य सरकार भरते.त्याच प्रमाणे […]

काटोल/कोंढाळी: प्रतिनिधी –
बहुजन सुखाय,बहुजन हिताय
असे ब्रिद वाक्य घेऊन प्रवासी सेवा देणार्या लाल परिला सद्ध्या तरी बरे दिवस आले आहेत. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना लालपरितू प्रवासादरम्यान अर्धेच तिकीट भाडे द्यावे लागते. तर अर्धे प्रवास भाडे राज्य सरकार भरते.त्याच प्रमाणे ७५+ज्येष्ठ नागरिकांना शून्य प्रवास भाडे आकरले जाते. हे शुन्य भाडे ही राज्य सरकार द्वारा दिले जाते.शाळेकरी मुलींना मोफत प्रवास पास तर मुलांचे (२५वर्ष पर्यंत)६७%प्रवासी भाडे ही राज्य सरकार कडून मिळते,६५ते ७४वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचे अर्धे भाडे सरकार भरते. लाडक्या बहिणींना अर्धे भाडे केल्यापासून लाडक्या बहिणींचा प्रवास वाढला आहे प्रत्येक बस फेरीत अर्ध्याधिक लाडक्या बहिणीं दररोज प्रवास करतात . अर्थात अर्धे प्रवास भाडे सरकार भरते व अर्धे प्रवास भाडे लाडकी बहीण भरते, तसेच जवळपास ६३समाज घटकांची सवलती ची रक्कम मिळतेच,बाकी ६४वर्ष वयोगटातील पुरुष पुर्ण प्रवासी भाडे भरतात. या सर्वातून एस टी महामंडळाला तोटा भासायला नको. तरी एस चे अध्यक्ष व नव निर्वाचित बिन खात्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले सांगतात एस टी महामंडळ तोट्यात आहे!
लाडक्या बहिणी, लाडके नागरिक, लाडके शेतकऱ्यांचे लाडके सरकार सत्तेवर आले आहे. यांनी तर महागाई वर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे पण वृत लिहे पर्यंत बिन खात्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या लाडक्या मुख्यमंत्री, व दोन्ही जिवलग उपमुख्यमंत्री यांचे कडून डिझेल वरिल सरचार्ज व प्रत्येक प्रवासी१७.५०% प्रवासी कर कमी करण्यासाठी आपले वजन खर्ची घालून लाडक्या बहिणीं/भाऊ/ ज्येष्ठ/कनिष्ठ नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.
शासनाने ६३ सामाजिक बांधिलकीच्या योजनांची रक्कम एस टी महामंडळाला वेळेचे आतच दिले तरी प्रवासी दर करण्याची आवश्यकता नसल्याचे ही सांगितले जाते.
गेली अनेक वर्षे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एस टी महामंडळाच्या ३१विभागापैकी २०विभागांनी ऑगस्ट महिन्यात १६कोटी८६लाख ६१हजार रूपयांचा नफा कमावला होता.अर्थात तब्बल नऊ वर्षांनी एसटी महामंडळाला फायदा झाला आहे.
आज एस टी महामंडळाच्या तिन हजार पेक्षा अधिक प्रवासी बसेस स्क्रॅप चे मार्गावर आहेत. एसटी बसेस वाढविले तर एस टी चे आर्थिक उत्पन्न वाढू शकते ‌‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *