BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अपारंपरिक ऊर्जेद्वारे ५० टक्के वीजेचा वापर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुटीबोरीतील अवाडा प्रकल्पाचे भूमिपूजन; १३ हजार ६५० कोटींची गुंतवणूक, ५ हजार युवकांना मिळणार रोजगार

Summary

नागपूर, दि. 7 : सौर ऊर्जेसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य व उपकरणांची निर्मिती अवाडा कंपनीतील नागपूरच्या नियोजित प्रकल्पात होणार आहेत. महाराष्ट्राने कायम ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर विशेष भर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे […]

नागपूर, दि. 7 : सौर ऊर्जेसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य व उपकरणांची निर्मिती अवाडा कंपनीतील नागपूरच्या नियोजित प्रकल्पात होणार आहेत. महाराष्ट्राने कायम ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर विशेष भर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे 2030 सालापर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून 50 टक्के वीजेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील अवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या एकात्मिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अवाडा कंपनीचे अध्यक्ष विनीत मित्तल, सुरेश सोनी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राज्यात 12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे काम सुरू केले आहे. ही देशातील सर्वात मोठी सौरऊर्जा निर्मितीची योजना आहे. अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्रात 12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे नियोजन सुरू आहे. आणखी 4 हजार मेगावॅटचे काम प्रगतिपथावर आहे. अवघ्या अडीच वर्षांत सुमारे 20 हजार मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले असून त्यांचे काम सुरू केले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

अवाडाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून 13 हजार 650 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यासोबतच 5 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 51 टक्के महिला कामगारांचा समावेश या कंपनीत करण्याचा संकल्प कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.  फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राने ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियाचे धोरण तयार केले. या धोरणाचा राज्याला फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *