महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणीवर भर द्यावा. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन

Summary

मुंबई, दि. 23 : अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. श्री. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी हरींदर […]

मुंबई, दि. 23 : अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. श्री. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी हरींदर ओबेरॉय, संचालक पश्चिम विभाग श्रीमती प्रीती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातील अन्न  व औषध प्रशासन कार्यालय आणि प्रयोगशाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (विधी) चंद्रकांत थोरात,  सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई शशिकांत केकरे, अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती संगीता ठाकूर व इतर अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त आणि प्रयोगशाळेतील सहयोगी कर्मचारी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान या संकुलात अन्न व औषध प्रशासनाचे कामकाज कसे चालते, तसेच प्रयोगशाळेत येणारे नमूने कशा पद्धतीने तपासले जातात याची पाहणी त्यांनी केली. प्रशासनाच्या चौथ्या मजल्यावर प्रयोगशाळेकरिता नव्याने बांधकाम सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच अत्याधुनिक प्राणी गृह, अन्न तपासणी केंद्र,  अन्न दर्जा तपासली जाणारी प्रयोगशाळा येथे भेट दिली.

भेटी दरम्यान अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक श्रीमती ठाकूर यांनी मुंबई, नागपूर व औरंगाबाद प्रयोगशाळेबाबत सादरीकरण केले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन,यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.

​सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई श्री. केकरे, यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *