अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवले जात आहे. रामदास मरकाम विद्यार्थी आहेत पण प्रवेश मिळत नाही
Summary
आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय! विद्यार्थी व पालकांची जिल्हाशिक्षणाधिकारी (माध्यमिक),सी ई ओ, व उपसंचालक शिक्षण यांचे कडे पायपीट राज्याचे शिक्षणमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री यांच्याकडे अतिरिक्त प्रवेशास मान्यता देण्याची पालकांची मागणी वार्ताहर-काटोल येथील लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्ता यादीनुसार राज्य […]

आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय!
विद्यार्थी व पालकांची
जिल्हाशिक्षणाधिकारी (माध्यमिक),सी ई ओ, व उपसंचालक शिक्षण यांचे कडे पायपीट
राज्याचे शिक्षणमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री यांच्याकडे अतिरिक्त प्रवेशास मान्यता देण्याची पालकांची मागणी
वार्ताहर-काटोल
येथील लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्ता यादीनुसार राज्य शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या विज्ञान शाखेत (८०), वाणिज्य (८०), कला शाखेत (८०) असे एकूण २४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. तसेच ३५० विद्यार्थी वाढीव प्रवेश प्रतिक्षेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढाळी व लगतच्या धोतीवाडा, कामठी, मासोद, जामगड, म्हसाळा, गणेशपूर, दुधाळा आणि कोंढाळी नगर येथे तीन हायस्कूल आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल जास्त लागला. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने पालकांमध्ये आपल्या पाल्याचे शिक्षण वाया जाऊ नये म्हणून चिंतेत असून विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त प्रवेशासाठी स्थानिक मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय मंडळावर दबाव वाढू लागला. अतिरिक्त प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची यादी मुख्याध्यापकांनी जिल्हा शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना पाठविल्यानंतर -्फक्त40 चे प्रवेश देण्यात आले.आणि पहिल्या 20 विद्यार्थ्यांना आणि 20 नंतर अतिरिक्त प्रवेश मंजूर केले आहेत. तरीही 50 विज्ञान, 52 वाणिज्य, आणि कला शाखेचे18 असे एकूण 120 विद्यार्थी आणि पालक अतिरिक्त प्रवेशाच्या प्रतीक्षेत कनिष्ठ महाविद्यालयात चकरा मारत आहेत. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे वाढीव प्रवेशाचे साठी यादी पाठविण्याची माहिती देण्यात आली आहे.
सत्य! हे आहे की कोंढाळी व आजूबाजूची गावे आदिवासीबहुल व शेतमजूर वर्गाची आहेत.तसेच काटोल व नागपूरनंतर येथे विज्ञान शाखा आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे नागपूर किंवा काटोलला जाता येत नाही, आता राज्य सरकारच्या शिक्षण विभागांकडून आदिवासी व शेतमजूरी करनारे पालकाचे विद्यार्थ्यांसाठी शाळा तर आहेत, मात्र अतिरिक्त प्रवेशाला मान्यता मिळत नसल्याने गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. *या करिता कोंढाळी येथील पालकांनी आपल्या पल्लांसह नागपूर जिल्हा परिषदेचे नव नियुक्ती सभापती बाळासाहेब जोध, जि प सदस्य सलील देशमुख, काटोल पंचायत समितीचे सदस्य अरूण उईके, माजी जि प सदस्य रामदास मरकाम यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर,जिल्हा शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर तसेच उपसंचालक शिक्षण वैशाली जामदार यांना प्रत्यक्ष भेटले यात शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनी अजून तरी सकारात्मक उत्तर दिले नाही. मात्र जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी योग्य ती माहिती घेऊन पुढिल कार्यवाही करण्यास सांगितले.*
आता तर ग्रामीण भागातील 11व्या वर्गाचे वाढिव प्रवेश न मिळाल्याने वर्षे वाया जाण्याची वेळ शिल्लक विद्यार्थी वर्गावर अली आहे .
शिक्षणमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी
तहसील शिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्या कडे कोंढाळी येथील 120 पालकांनी वारंवार भेटी देऊनही अतिरिक्त प्रवेशासाठी मान्यता दिली जात नाही.अशी स्थिती शिक्षण विभागाची आहे.आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. नागपूरचे मंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथील विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्रवेश मंजूर करण्याची मागणी केली आहे.