अनुकंपा धारकांची गंभीर अवस्था पाहता चन्द्रपुर जिल्ह्याधिकारी यांना निवेदन
जिल्हा चंद्रपुर वार्ता:- मागील १५ ते २० वर्षूयापासुन रेंगाळत असलेल्या अनुकंपा धारकांची गंभीर अवस्था पाहता जाचक अटी ‘रद्द करून चंद्रपूर शहर म. न. पा. अनुकंपा धारकांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ८० पैकी ७० उमेदवारांना सरसकट म.न.पा. सेवेत सामावून घेण्या साठी योग्य तो न्याय मिळवून देण्या बाबत आज चंद्रपूर शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले l या वेळी कृणाल रामटेके (अध्यक्ष,काँग्रेस अनुसूचित जाती विभाग), महेश तावाडे, गोपाळ वाळके, नम्रता कर्मंकर, प्रशांत गाडीलवर, शुभम गौरकर, अक्षय कार्लेकर, अक्षय आत्राम आणि मनीष नैताम उपस्थित होते l