अनिल देशमुखांचे काटोल मधे जंगी स्वागत

कोंढाळी-प्रतिनिधी/ दुर्गाप्रसाद पांडे
१00कोटी रूपयांच्या ऐकिव माहिती च्या आधारे केलल्या तक्रारी वरून ई डी- सी बी आय – कडून दाखल तक्रारी व त्यानंतर १००कोटी चा सुरू असलेला तपास, या तपासाअंती उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनां नंतर या भागाचे आमदार अनिल देशमुख १७ फेब्रुवारी रोजी प्रथमच आपल्या मतदारसंघात पोहचले.
काटोल विधानसभा मतदार संघातील काटोल हद्दीत पोहोचताच मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी त आपल्या नेत्याला सजावटी वाहनातून दुचाकी च्या रैली चे माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांसह काटोल येथील चौका चौकातील भव्य स्वागत स्विकारत कार्यक्रम स्थळी जि.प.स्टेडियम वर पोहचले.
आमदार अनिल देशमुख स्टेडियम च्या सभास्थळी पोहचताच सभास्थळी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी *अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है* च्या गगन भेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या प्रसंगी -सभा मंचावर महाविकास आघाडी चे ज्येष्ठ पदाधिकार्यांची उपस्थितीत महा विकास आघाडी च्या नेत्यांनी राज्याचे माजी गृह मंत्री व काटोल चे आमदार अनिल देशमुख यांच्या ८०टक्के समाज सेवा व २० टक्के राजकारणातून सुरू असलेल्या समाज सेवा व त्या माध्यमातून मिळालेली लोकप्रियता चे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर आपल्या मतदारसंघाती जिव्हाळ्याच्या मतदार, युवक, महिला -पुरूष, ज्येष्ठ नागरिक, कामगार, शेतकरी यांचे सोबत आज च्या सभेला उपस्थित जनसागर हे अनिल देशमुख यांच्या लोकप्रियता आज दिसून आली आहे असे मत या प्रसंगी सर्वांनी मांडत केंद्र सरकार च्या हस्तक बाहूले ई डी- सी बी आय- आय टी-कडून अनिल देशमुख यांच्या सह त्यांचे कुटुंबीय, सहकारी,अधिनस्थ कर्मचार्याचा छळाबाबद माहीती दिली.
या प्रसंगी-अनिल देशमुख यांनी-हायकोर्टाचे निरीक्षण वाचून दाखविले . शरद पवार साहेब व राष्ट्रवादी पार्टीचे आभार मानले. आर्थर जेल मधे अनेक यातना सहन कराव्या लागल्या जेल मधील कठीण प्रसंग सांगण्यात आले.आरोप करणारे फरार झाले .अनिल देशमुख यांच्या पत्नी आरतीताई देशमुख यांनी आपल्या मनोगतात आमच्या कुटुंबाला गुन्हा नसताना अग्नी परीक्षा द्यावी लागली याचे दुःख कधीही विसरणार नाही असे कथन केले. कापूस आणि संत्राच्या भावासाठी संघर्ष करणार अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी त्यांच्या शेतीचा लिलाव करू नये यासाठी प्रयत्न करणार व विकास कामाला गती देन्याचे आश्वासन दिले.काटोल नरखेड विधानसभेतील मतदारांचे व चाहत्यांचे आभार मानले.