“अनाथ कॅन्सरग्रस्त गरजू करिता पीडितांना एक हात मदतीचा” स्वर संगीताचे, प्रवास सुरांचे” संगीत उत्सव कार्यक्रमाचे आयोजन”
Summary
चंद्रपूर:- स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे नुकताच महान संगीतकार यांनी स्वरबद्ध केलेल्या गीत संगीताचा कार्यक्रम *”स्वर संगीताचे, प्रवास सुरांचे”* हा कार्यक्रम दिनांक २५.०५.२०२५ ला आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे प्रमुख […]

चंद्रपूर:- स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे नुकताच महान संगीतकार यांनी स्वरबद्ध केलेल्या गीत संगीताचा कार्यक्रम *”स्वर संगीताचे, प्रवास सुरांचे”* हा कार्यक्रम दिनांक २५.०५.२०२५ ला आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.पवार साहेब,प्रदीप अडकिने, सुभाष शिंदे,अशोक नंदुरकर, किशोर तळवेकर,दिलीप वंजारी साहेब, डॉ.प्रकाश कुंटेवार,यांची उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते दीप-प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात अनाथ, कॅन्सरग्रस्त गरजू व्यक्तींना,निसर्ग बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर आणि व्हिनस कल्चरल ग्रुप तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमास गायक कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात सुंदर गीते सादर केले त्यात सागर मदुकटके,अनुराग शुक्ला, राजेश धोंगडे,संजय पोटदुखे, मोहम्मद रफीक , किशोर येरणे, नितीन नंदनवार, देवदत्त सातपुते, ज्योती तोहगावकर,रश्मी हिवरे,शोभना शेख,अंजली आंबटकर , रत्ना रायपूरे, संचिता बनकर,रजनी परसराम, यांचा समावेश होता.तर म्युझिशियन आणि रिदम मध्ये महेंद्र ढोले,अशोक तोक्कलवार,योगेश मडावी,राहुल रामटेके, डॉ.प्रदीप आकोटकर, सोहम कामटकर , मनोज देशमुख, पिटर , दाक्षायनी मॅडम,यांचा समावेश होता. प्रेक्षकांनी गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला, या कार्यक्रमाचे आयोजन व्हिनस फ्रेंड्स कल्चरर गृप आणि निसर्ग बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था चंद्रपूरचे विकास पडगेलवर, नितीन नंदनवार, सुशील तळवेकर, शब्बीर शेख, सुदेश भालेकर किशोर येरणे यांनी केले.साऊंड सिस्टीम निखिल गटलेवार,लायटिंग शुभम फाले, शशिकांत शेंडे , कुश आणि स्क्रीन अजय नंदुरकर यांनी केले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ . मुक्ताताई बोजावार आणि शब्बीर शेख यांनी केले आणि सूत्रसंचालन अस्लम खान सौ . मुक्ताताई बोजावार आणि यांनी केले तर आभार किशोर येरणे यांनी मानले.