अनलॉकनंतर बाजारपेठेत उसळली गर्दी स्वयंशिस्त पाळणे गरजचे
Summary
चंद्रपूर बाजारपेठ चंद्रपूर, राजुरा, कोरपना – जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी बाजापेठेत चांगलीच गर्दी उसळली. रस्त्यावर देखील चांगलीच वर्दळ होती. मात्र दुसरीकडे तिसर्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कोरपना […]

चंद्रपूर बाजारपेठ
चंद्रपूर, राजुरा, कोरपना –
जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी बाजापेठेत चांगलीच गर्दी उसळली. रस्त्यावर देखील चांगलीच वर्दळ होती. मात्र दुसरीकडे तिसर्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे.
कोरपना बाजारपेठ
सोशल डिस्टंन्स पाळण्यासह मास्क लावणे अशा नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. कोरोनामुळे 15 एप्रिलपासून लॉकडाऊन लागू होता. आता जिल्ह्यात रुग्णसंख्या घटल्याने आज दि.7 पासून अनलॉक करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारचे व्यवहार हे सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. तर प्रवासी वाहतूक सुरू झाली असून बसस्थानकात देखील प्रवाशांची किरकोळ का होईना पण वर्दळ दिसून आली. आज सकाळपासूनच काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून साफसफाई केली. दुकाने उघडी झाली असली तरी दुकानात ग्राहक जेमतेमच होते. आज आमचा विदर्भच्या चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर व कोरपना प्रतिनिधीनी बाजारात फेरफटका मारला असता जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सोडून अन्य दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसले.