अत्याचारी आरोपीस वीस वर्षे सश्रम कारावास जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क वृत्तसंकलन भंडारा:-
शहरातील कस्तुरबा गांधी वार्डातील एका २४ वर्षीय तरुणाने एका तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडारा यांनी आरोपी विरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने निखिलेश सयाम राहणारा कस्तुरबा गांधीवॉर्ड, भंडारा याला २० वर्षे सश्रम करावास व ५००० रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पीडित मुलीचे वडील व आई हे वेगळे राहतात वडिल आपल्या सात वर्षीय मुलीसोबत राहत असून मजुरीचे काम करीत आहेत. पीडित मुलगी ही तिसऱ्या वर्गात शिकत होती. दिनांक ०३ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता पिडिताचे वडील कामावरून घरी लवकर आले असता निखिलेश हा मद्य प्राशन करून झोपल्याचे दिसून आले. तेव्हा वडिलांनी आपल्या मुलीला रागावले होते. तेव्हा निखिलेश सयाम यांनी मुलीच्या वडिलाला तू माझ्या मुलीला का रागावतोस असे बोलून घरी निघून गेला. दिनांक ०७ मार्च २०१९ रोजी मुलीचे वडील घरी असताना रात्री ०८:३० वाजता पीडित मुलीने काल दुपारी मी जेवण करीत असताना निखिल घरी आला होता तेव्हा त्याने डोळ्यावर व गालावर मारले मुलगी एकटीच असल्याची संधी साधून तिच्यावर अत्याचार केल्याचे मुलीने वडिलाला सांगितले. वडीलाने भंडारा पोलिसात जाऊन तक्रार नोंदविली. तक्रारी वरून पोलिसांनी कलम ३७६ (अ), (ब), ३७७, ३२३ भादंवी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सह कलम ४, ८ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधू यांनी केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून साक्ष पुरावे गोळा केले. पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोप पत्र विशेष सत्र न्यायालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. अस्मर यांचे न्यायालयात चालली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी बाजू मांडून साक्षीदार तपासले. दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे आरोपी निखिलेश सयाम याला दोषी ठरवून कलम ३७६ भादंवी, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साध्या करावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाची रक्कम पीडित मुलीला आर्थिक सहायता म्हणून देण्याचे आदेश केले आहे. सदर प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात भंडाऱ्याचे पोलीस हवालदार छोटेलाल रहांगडाले यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज केले.