अतीवृष्टी व पूरग्रस्त भागात जि प सदस्य सलील देशमुख भेट देत पूर परिस्थितीची पाहणी केली.

अतीवृष्टी व पूरग्रस्त भागात जि प सदस्य सलील देशमुख भेट देत पूर परिस्थितीची पाहणी केली.
सलील देशमुख यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट.
कोंढाळी-वार्ताहर
जिल्हातील काटोल विधानसभा मतदारसंघात मागील ४-५ दिवसांपासून सतत अतिवृष्टी होत आहे. सततच्या पावसाने या भागातील नदी नाले ओसांडून वाहू लागले आहेत. तर सतत च्या पावसामुळे या भागातील नदी व नाल्या काठाचे गावांना तसेच लगतचे शेतकर्यांना जबर फटका बसला. या करीता १६जुलै रोजी जि ट सदस्य सलील देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील नागपूर ग्रामीण भागातील व्यहाड, पेठ कलाडोंरी , काटोल तालुक्याच्या पांजरा काटे, तरोडा,नांदोरा, खापा, मेंढेपठार सह नरखेड तालुक्यातील अनेक गांवाना भेटी दिल्या . यात व्यहाड पेठ येथील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने जोराच्या पावसामुळे व्याहाड गावचा मुख्य मार्ग पाण्याखाली गेला त्यामुळे गावचे नागरिक शाळेकरी विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याची माहिती गावकर्यांनी दिली, तसेच व्याहाड ते पेठकला डोंगरी मार्गे दोन्ही गावांना जोडणार्या मार्गावर जागो जागी खड्डे पडत चालल्याचे तक्रारी करण्यात आल्या. याप्रसंगी नागपुर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती भारती पाटील, पं स सदस्य अविनाश पारधी व गावचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी हाजर होते. त्याच प्रमाणे काटोल तालुक्यात तरोडा या गावात लगतच्या टेकड्यांचे पावसाचे पावसाचे पाणी येथील नाल्याला च्या जोड पुलाचे पायल्या बुजल्याने व संततधार पाऊसाने लगतच्या नाल्याचे पाणी गावात शिरले. या बाबदची पाहणी केल्यावर उपस्थीत बांधकाम अधिकार्यानां येथील पुलाचे बांधकामाचे संबंधित सुचना करण्यात आल्या, यानंतर नांदोरा, खापा, व मेंढेपठार जंगली येथील नाल्यालाचे बांधकामा बाबद सुचना दिल्या. या प्रसंगी पंचायत समीती, राजस्व, बांधकाम, आरोग्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, जि प नागपुर चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले , माजी उप सभापती निळकंठराव ढोरे, पं समीती सदस्य संजय डांगोरे, अरूण उईके, सरपंच विजू सरवरे , उपसरपंच राजेंद्र चरडे, सरपंच थामस निंभोरकर, सरपंच केशवराव धूर्वे, स्वप्निल व्यास, ग्रा प सदस्य संजय राऊत, आकाश गजबे, नीतीन ठवळे,प्रशांत खंते, तुळशीराम बेहरे,तसेच संबंधित गावचे स्थानिक स्वराज्य संस्था चे पदाधिकारी , या भागातील नागरिक उपस्थित होते.