क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

अडयाळ परिसरात सलग मोसा चोरी – दोन बाईक्स रातोरात गायब; शिताफीने काम करणारे चोर अजूनही फरार

Summary

भंडारा जिल्हा, ता. पवनी – अडयाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीत दोन वेगळ्या ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी संधी साधत दुचाकी लंपास केल्या असून एकूण ६५ हजार रुपये किमतीचा माल […]

भंडारा जिल्हा, ता. पवनी – अडयाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीत दोन वेगळ्या ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी संधी साधत दुचाकी लंपास केल्या असून एकूण ६५ हजार रुपये किमतीचा माल चोरीला गेला आहे. पोलीस तपासाला सुरुवात झाली आहे.
घटना क्रमांक १ : घरासमोर उभी असलेली हिरो डिलक्स गायब
फिर्यादी वैजंता अंबादास खोब्रागडे (६२ वर्षे, रा. खांबाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबर रात्री १० वाजता ते १८ डिसेंबर पहाटे १.३० दरम्यान त्यांच्या घरासमोरील पोर्चमध्ये उभी केलेली
हिरो डिलक्स (क्र. MH-36-B-0766, लाल-काळा रंग) दुचाकी अज्ञात चोराने पळवून नेली.
बाईकची किंमत अंदाजे २५,००० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या मौखिक अहवालावरून अडयाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 383/2025, कलम 303(2) भा.न्या.सं. नुसार चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पो.हवा. डेकाटे (मो. 7774989768) करीत आहेत.
घटना क्रमांक २ : लिफ्ट मागितली… आणि बाईक घेऊनच पळाला
दुसऱ्या घटनेत मधुकर दामाजी बारसागडे (५५ वर्षे, व्यवसाय : एसटी चालक, रा. चिखली) यांची
हिरो स्प्लेंडर (क्र. MH-36-TH-1446, काळा रंग, हिरवा पट्टा) पळविण्यात आली.
१७ डिसेंबर रात्री साधारण ८.३० वाजता, एक सडपातळ, अंदाजे ३० वर्षांचा अनोळखी इसमाने लाखनी फाट्यावरून लिफ्ट मागितली. फिर्यादीने त्याला चिखली बस स्टॉपपर्यंत सोडले. त्यानंतर फिर्यादीला प्रसाधनासाठी जायचे असल्याने किल्ली मोटारमध्येच ठेवली.
तो बाथरूममध्ये जाताच, संधी साधत अज्ञात इसमाने बाईक सुरु करून सरळ रोडने फरार झाला. बाईकची किंमत ४०,००० रुपये सांगण्यात आली आहे.
अडयाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 384/2025, कलम 303(2) भा.न्या.सं. नुसार प्रकरण दाखल असून तपास त्याच अधिकाऱ्याकडे – पोहवा डेकाटे सुपूर्द आहे.
पोलिसांचे आवाहन
– लिफ्ट देताना खबरदारी
– वाहन बंद करून किल्ली स्वतःकडे
– घरासमोर बाईक सुरक्षित लॉक
– संशयास्पद व्यक्तींवर लक्ष
दोनही गुन्ह्यातील चोर अजूनही ओळख पटलेले नाहीत. सीसीटीव्ही आणि नेटवर्क विश्लेषण सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अडयाळ परिसरात अलिकडील काळात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिक करत असून पोलीसांनी गस्त वाढवण्याची मागणीही होत आहे.

प्रस्तुत पंचनाम्याची फोटो स्वतःच्या मोबाईल मध्ये नसल्याचे तसेच ती फोटो देण्यास असमर्थ असल्याचे पो.हवा. डेकाटे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *