अटल भूजल योजना अभियानांतर्गत समाविष्ट गांवाची पाहणी काटोल तालुक्यातील खुर्सापार ग्रा प चे आयुक्त कलशेट्टी कडून पाहणी (निरिक्षण)
वार्ताहर-कोंढाळी
आज दिनांक 19/ 08/2021 रोजी अटल भुजल योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये आयुक्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी काटोल तालुक्यातील खुर्सापार ग्रा प ला भेट दिली. सदर भेटीदरम्यान ग्रामपंचायत मध्ये त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मध्ये अटल भूजल योजना अंतर्गत भूजल पुनर्भरण पाण्याच्या बचती करता मायक्रो इरिगेशन पद्धती चा अवलंब करणे, पाण्याचे योग्य नियोजन करून, गाव पाणीदार करणे व हिवरे बाजार गावासारखे एक मॉडेल गाव म्हणून अटल भुजल योजनेअंतर्गत खुरसापार गाव ही तसेच बनविने या करीता हिवरेबाजार गावाचा आदर्श समोर ठेवून सदर योजनेअंतर्गत काटोल व नरखेड तालुक्यातील अटल भुजल योजनेमधील गावे कशाप्रकारे स्मार्ट व्हिलेज करीता निवड करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. खुर्सापार गावाला संत गाडगेबाबा अभियानाअंतर्गत पुरस्कार मिळाला व सांडपाणी नियोजन व पाणीबचतीच्या उपायोजना तसेच covid-19 मुक्त गाव म्हणून पारितोषिक मिळाले या बाबद आयुक्ततांनी सदर गावाची प्रशंसा केली, व समाधान व्यक्त केले तसेच सरपंच सुधीर गोतमारे हे ग्राम विकासाचे महत्त्वाचे कामा करिता मुंबई येथे असल्यामुळे सरपंच गोतमारे यांनी व्हिडिओ दूरध्वनी द्वारे आयुक्तांशी चर्चा केली ,शेवटी आयुक्त कलशेट्टी यांनी गाव फिरी करून शोषखड्डे सांडपाणी नियोजन, सर्व शासकीय इमारती वरील पाऊस पाणी संकलन, लोकसहभागातून तयार करण्यात आलेले नाना नानी पार्क , गावात व इत्तरत्र केलेले झाडांची लागवड , इत्यादी ची पाहणी केली व सरपंच व गावकऱ्यांच्या कामाबाबद समाधान व्यक्त केले. सदर भेटीदरम्यान माजी उपसभापती व सभापती योगेश गोतमारे उपसरपंच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर उपसंचालक मंगेश चौधरी उपसंचालक अमरावती विभाग- कराड भूवैज्ञानिक अधिकारी डॉ वर्षा माने, डॉ शिवाजी पद्मने, राजेश गावंडे, नंदकिशोर बोरकर ग्रामसेवक भादे ,तलाठी कृषी सहाय्यक व गावकरी उपस्थित होते।